जैवविवधतेने नटलेल्या दहा देशांत ऑस्ट्रेलियाचाही समावेश आहे. जगाच्या पाठीवर कुठेही न आढळणा-या प्रजाती येथे आढळतात. अशा या जैवविविधतेने नटलेल्या देशात जगातील सगळ्यात सुखी प्राणी राहतो बरं का! अनेकांना मात्र या प्राण्यांबद्दल विसर पडला होता. आज अचानक या प्राण्याची आठवण झाली याचं कारण होतं एका सायकलिस्टने शेअर केलेला त्याचा फोटो.

ऑस्ट्रेलियात क्वोको नावाने ओळखला जाणारा हा प्राणी जगातील सगळ्यात सुखी प्राणी असल्याचे तरी इथले लोक मानतात. ऑस्ट्रेलियातल्या रॉटनेस्ट बेटांवर हा प्राणी आढळतो. पण ही प्रजाती जवळजवळ नष्टच होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हा प्राणी आहे की नाही याचाच सगळ्यांना विसर पडला होता, पण या बेटावर पहिल्यांदाच सायकलिंगसाठी आलेल्या एका सायकलिस्टला मात्र या प्राण्याचे दर्शन झाले. त्याचे भाग्य एवढे चांगले, की त्याला पाहून पळून जाण्याऐवजी क्वोको अधिक जवळ आला. या पठ्ठ्याला त्याच्यासोबत दोन तीन फोटोही काढता आले. आश्चर्याची बाब म्हणजे एरव्ही माणसांना पाहून पळ काढणारे प्राणी या प्राण्यात मात्र खूप फरक असल्याचे दिसून आले. न घाबरता त्याने या सायकलिस्टसोबत फोटोही काढले. या सायकलिस्टच्या पोस्टनुसार तिथून निघाल्यानंतरही बराच वेळ क्वोको त्याच्या मागे मागे येत होते. तेव्हा त्याच्यासोबत पुन्हा थोडा वेळ घालवून सायकलिस्ट निघाला. क्वोको प्राणी हे सहज मिसळून जातात, त्यांना नवीन गोष्टींविषयी खूपच कुतूहल असते, म्हणूनच त्याने या माणसांची गठ्ठी केली असल्याचे म्हटले जाते. या सायकलिस्टच्या पोस्टने का होईना पण हा सुखी प्राणी आपल्या देशात अस्तित्त्वात आहे हे तरी लोकांना कळलं.

china sinking
न्यूयॉर्क आणि टोकियोनंतर चीनमधील शहरेही जलमय; जगातील ‘ही’ शहरे पाण्याखाली जाण्याचे कारण काय?
Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
in wardha Water Crisis Hits Bor Sanctuary
वर्धा : जंगलात पाणीटंचाई, प्राण्यांसाठी १५ बोअरवेलचे काम सुरू

quokka-1