21 October 2018

News Flash

वाचा अशा तरूणाबाबत ज्याला पंतप्रधान मोदीही ‘फाॅलो’ करतात

पंतप्रधान मोदींना या तरूणाने केलं प्रभावित

विरोधी पक्षांच्या आरोपांवर टिप्पणी करताना त्यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनची (इव्हीएम) नवी व्याख्या केली आहे. काही पक्षांसाठी इव्हीएम म्हणजे 'एव्हरी व्होट फॉर मोदी' असंच वाटतंय, असे वक्तव्य व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.

ट्विटरवर आपण अनेक लोकांना फाॅलो करत असतो. आपलेही अनेक फाॅलोवर्स असतात. फेसबुवकवर काही वर्षांपूर्वी ज्याचे जास्त ‘फ्रेंड्स’ तो जास्त फेमस असं उगाचच मानलं जातं. पण ट्विटरच्या बाबतीत फाॅलोअर्सच्या संख्येपेक्षा किती महत्वाच्या व्यक्ती आपल्याला फाॅलो करतात यावर सगळं अवलंबून असतं. फाॅलोअर्सची संख्या महत्त्वाची अाहेच. पण त्याचसोबत ‘इन्फ्लुएन्सर्स’ म्हणजे समाजावर सोशल मीडियाद्वारे प्रभाव टाकू शकणाऱ्या व्यक्ती जर तुमच्या फाॅलोअर्स असल्या तर ट्विटरवर तुमची काॅलर आपोआप ताठ होते.

आता तुम्हाला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी फाॅलो करायला लागले तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? नक्कीच आश्चर्यचकित व्हास. पण आकाश जैन या तरूणाच्या बाबतीत हे प्रत्यक्ष घडलंय. त्याला चक्क पंतप्रधानांनी ट्विटरवर फाॅलो केलंय.

आकाश जैेन बंगळुरूचा राहणारा आहे. त्याच्या बहिणीचं लग्न आहे. तिच्या लग्नाच्या आमंत्रणपत्रिकेत त्याने ‘स्वच्छ भारत अभियानाचा’ लोगोही छापला. या अभियानाविषयी समाजात जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने त्याने ही लग्नपत्रिकेत हा लोगो छापला. आणि ही आमंत्रणपत्रिका त्याने ट्विटरवर शेअर करत त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नावे एक संदेशही लिहिला. त्याच्या या ट्वीटची पंतप्रधान मोदींनी स्वत: दखल घेतली आणि त्याला फाॅलो करायला सुरूवात केली.

आणि काही तासांमध्येच भाजपच्या बड्याबड्या नेत्यांनी आकाश जैनचं ट्वीट ‘रिट्वीट’ करायला सुरूवात केली. ‘स्वच्छा भारत अभियान’चा लोगो आपल्या बहिणीच्या लग्नाच्या आमंत्रणपत्रिकेत छापला जावा अशी आपल्या बाबांची इच्छा असल्याचं त्यांने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिंलं होतं. ट्विटरवर लाखो फॅन्स असणारे नरेंद्र मोदी स्वत: फक्त काही हजार जणांनाच फाॅलो करतात त्यामध्ये आता आकाश जैनचा समावेश झाला आहे.

First Published on April 4, 2017 4:02 pm

Web Title: read why pm modi follows this man on twitter