16 October 2019

News Flash

अबब..! २७८ किलो वजनाचा मासा विकला ३१ लाख डॉलरमध्ये

ब्लुफिन प्रजातीचा मासा

जापानमधील एका व्यक्तीने नववर्षाच्या पहिल्या दिवशी झालेल्या लिलावात तब्बल ३.१ मिलियन डॉलर रुपयाला माशाला विकत घेतले आहे. या माशाचे नाव ट्युना असे आहे. या माशाचे वजन २७८ किलोग्रॅम असून ब्लुफिन प्रजातीचा आहे. ट्युना किंग नावाने ओळखले जाणारे कियोशी किमुरा या व्यक्तीने लाखो डॉलर्स देऊन खरेदी केला आहे. टोकिओच्या मासळीबाजारात झालेल्या लिलावामध्ये ट्युनाला ही किंमत मिळाली आहे. गेल्या आठ वर्षांमधील सात वर्षांत किमुरा यांनी माशासाठी सर्वोच्च किंमत मोजली आहे. यापुर्वी २०१३ साली ट्युना माशासाठी १४ लाख डॉलर्स मोजण्यात आले होते. हा रेकॉर्ड कियोशी यांनी मोडला आहे.

टोयोसू येथे गेल्या वर्षी सुरू झालेल्या नव्या मासळी बाजारामध्ये एक जानेवारी रोजी लिलाव करण्यात आला. २०१८मध्ये जपानमध्ये माशांची पकड कमी झाल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम म्हणून गेल्या वर्षाच्या मध्यंतरी माशांच्या किमती ४० टक्क्यांहून अधिक वाढल्या होत्या.

‘मला चांगला ट्युना मिळाला. त्याची किंमत जास्त असली तरी ग्राहकांना या माशाची चव आवडेल असं मला वाटतं, असे एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना किमुरा म्हणाले’

First Published on January 5, 2019 4:26 pm

Web Title: record usd 3 1 million paid in new years tuna fish auction