21 September 2020

News Flash

Video : पत्रकाराच्या धाडसाने वाचले ट्रक ड्रायव्हरचे प्राण!

वार्तांकनावेळी केली मदत

पाण्यात अडकलेल्या ट्रक ड्रायव्हरला बाहेर काढण्यासाठी गेलेले बचाव पथक

आपले काम करताना पत्रकारांना कधी काय करावे लागेल सांगता येत नाही. कठीण परिस्थितीतही जीव धोक्यात घालून त्यांना वार्तांकन करावेच लागते. मग तो एखादा दहशतवादी हल्ला असो, भूकंपस्थिती असो नाहीतर पूर परिस्थिती. मात्र कामाप्रती असणारे कर्तव्य बजावत असतानाच पत्रकारांतील माणुसकीचे दर्शन आपल्याला अनेकदा घडते. अशाच प्रकारची घटना नुकतीच घडली आणि पत्रकारांतील धाडस पुन्हा एकदा समोर आले.

ह्युस्टनमध्ये एका टीव्ही वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने अतिशय अवघड परिस्थितीत पाण्यात अडकलेल्या ट्रक ड्रायव्हरला बाहेर काढण्यात मदत केली. ब्रँडी स्मिथ असे या महिला पत्रकाराचे नाव आहे. यावेळी कॅमेरामन मारिओ सँडोवाल हाही तिच्यासोबत होता. ‘KHOU 11’ या वृत्तवाहिनीसाठी वादळाचे वार्तांकन करण्यासाठी ते दोघे गेले होते. ते उभे असलेल्या रस्त्याच्या बाजूच्या रस्त्यावरील पाण्यात एक ट्रक अडकल्याचे कॅमेरामनला दिसले. त्याने आपल्यासोबतच्या पत्रकाराला ही गोष्ट लक्षात आणून दिली. तिने वार्तांकन सोडून या ड्रायव्हरला वाचविण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न सुरु केले.

या ट्रकचा जवळपास अर्धा भाग पाण्यात गेला होता. जवळपास १० फूट खोल पाण्यात ड्रायव्हर आपल्या गाडीत अडकल्याचे या महिला पत्रकाराने बचाव पथकाला सांगितले. बचाव पथकही एअरबोट घेऊन संबंधित ठिकाणी लगेचच पोहोचले. एअरबोट ड्रायव्हरच्या मदतीसाठी जात असताना ब्रँडी स्मिथने तुमच्या मदतीसाठी बचावपथकाची बोट येत असल्याचे ड्रायव्हरला कळवते. ड्रायव्हर पूर्ण ओला झाला असून तो गारठला असेल, तसेच तो अशा पद्धतीने पाण्यात अडकल्याने घाबरलाही असेल, असेही ती आपल्या रिपोर्टमध्ये सांगते. यानंतर एअरबोटने ड्रायव्हरला सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर सगळेच सुटकेचा निःश्वास सोडतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 11:16 am

Web Title: reporter rescues lorry driver from flood while reporting houston
Next Stories
1 जाणून घ्या, राम रहिम यांची संपूर्ण कहाणी
2 एक कागद चुकीचा वाचला म्हणून १६ तास केला प्रवास
3 आता रोबोटही करु शकणार अंत्यसंस्कार
Just Now!
X