News Flash

Video : पंजाबी सांताचा भांगडा पाहिलात?

'सांता सिंग'चा खास भांगडा अंदाज

ख्रिसमस जवळ आला की लहान मुलांना वेध लागतात सांताक्लॉजचे. रात्रीच्या वेळी झोपेत असताना गिफ्ट देऊन जाणारा हा सांताक्लॉज जगभरातील लहानग्यांना अतिशय जवळचा वाटतो. पण हाच सांताक्लॉज नाचायला लागला तर? तेही भांगडा करत असेल तर? आता सांताक्लॉज भांगडा कसा करेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण कॅनडामध्ये एका सांताक्लॉजने चक्क भांगडा करुन उपस्थितांना आश्चर्यचकित केले आहे. जगभरात ख्रिसमस सेलिब्रेशन सुरु झाले असताना हा सांताचा डान्स नोटीझन्सचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडियो २ वर्षापूर्वीचा आहे असे म्हटले जात आहे, पण तरीही तो आता व्हायरल होत आहे. यामध्ये सांताक्लॉजचा ड्रेस घातलेला पंजाबी व्यक्ती भांगडा करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडियोला इंटरनेटवर मोठी पसंती मिळत असून ६ मिनिटांची ही व्हिडियो क्लीप सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

कॅनडाच्या बर्फाळ रस्त्यांवर सांताक्लॉजप्रमाणे गिफ्ट वाटताना दिसत असलेला हा सांता उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहे. रस्त्यावर उभा असलेला हा पंजाबी व्यक्ती येणाऱ्या जाणाऱ्यांना सांताप्रमाणे गिफ्ट तर देतोच आहे. पण येथील नागरिकांबरोबर आणि प्रसंगी एकटाही तो भांगडा करताना दिसत आहे. त्यामुळे भांगडा करणारा सांताक्लॉज तुम्ही कधी पाहिला नसेल तर हा व्हिडियो तुम्ही नक्की पाहायला हवा.

हा सांता पंजाबी असल्याने त्याने सांताक्लॉजच्या लाल टोपीऐवजी लाल रंगाची पगडी घातली आहे. अनेकांना हा अनोखा असा पंजाबी सांता आवडला असून त्यांनी व्हिडियोवर प्रतिक्रिया देऊन आपले मत व्यक्त केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2018 1:44 pm

Web Title: santa singh viral video of dancing bhangra spreads joy during christmas in canada
Next Stories
1 १२ वर्षीय मुलाची जॅग्वारसोबत यारी-दोस्ती…
2 भयंकर ! आई-वडिलांनी नवजात बाळाला टाकलं रेल्वेच्या कमोडमध्ये
3 अनाथ मुलींच्या चेहऱ्यावर फुलले हास्य, या हिरे व्यापाऱ्याने ३००० मुलींचे केले कन्यादान
Just Now!
X