18 January 2021

News Flash

Video : टीम इंडियाच्या ‘गब्बर’चा मुलासोबत अतरंगी डान्स

सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी सध्या संपूर्ण देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आलं आहे. ३ मे पर्यंत जिवनावश्य गोष्टींचा अपवाद वगळता नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाहीये. या काळात सर्व क्रीडा स्पर्धा बंद असल्यामुळे भारतीय क्रिकेटपटूही आपल्या घरात राहून परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन सध्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो.

शिखरने आपल्या मुलासोहत Daddy Cool या बॉलिवूड गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा व्हिडीओ पाहून सांगा बरं कसा वाटता तुम्हाला टीम इंडियाच्या गब्बरचा कुल अंदाज…

याआधीही शिखर धवनने मुलांसोबत पिलो फाईट करताना, बायकोसोबत फिल्मी स्टाईलने डान्स करताना, घरात कपडे धुतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. न्यूझीलंड दौरा आटोपल्यानंतर भारतीय खेळाडू आयपीएलसाठी मैदानावर उतरणार होते. परंतु करोनामुळे देशभरात निर्माण झालेली परिस्थिती पाहिल्यानंतर बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत ही स्पर्धा स्थगित केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 2:08 pm

Web Title: shikhar dhawan posted his dance video with his son on social media psd 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 बबिता फोगटचं टि्वट : करोना नव्हे, ही आहे देशातील मोठी समस्या
2 Viral Video: गच्चीवर माकड उडवत होते पतंग; नेटकरी म्हणतात, “उत्क्रांतीचा वेग वाढला”
3 कामावर येऊ नको सांगितले असतानाही कामावर गेलेल्या कर्मचाऱ्याच्या तोंडावर बॉसनेच मारला बुक्का
Just Now!
X