लग्नावेळी प्रत्येकजण मनात वैवाहिक जोडीदाराबद्दलच्या कल्पना रंगवत असतो. आपला जोडीदार कसा असावा, याची रुपरेषाच तयार असते. कित्येकवेळा आपण वर्तमान पत्रातील लग्नाबद्दलच्या जाहीराती वाचून हसत असतो. एकापेक्षा एक अजब-गजब जाहिराती पाहायला मिळलात. बायको सोशल मीडियावर वापरणारी नसावी, अशी अट एका नवरदेवानं घातली आहे. त्या नवरदेवाची अपेक्षा असणारी जाहिरात सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प. बंगालमधील चॅटर्जी नावाच्या वकिलाने लग्नासाठी एक जाहिरात काढली आहे. या जाहिरातमध्ये मुलगी सोशल मीडियाची अॅडिक्ट असू नये असं म्हटलेय. नेहमी संस्कारी पत्नीच्या असणाऱ्या मागण्या म्हणजे वधु ही ‘, सुंदर, उंच, सडपातळ, देखणी असावी अशा आहेत पण यामध्ये एक वेगळीच मागणी लक्षात आली ती म्हणजे , पत्नी ही सोशल मीडिया अडिक्ट नसावी म्हणजे सोशल मीडियाचा जास्त वापर करणारी नसावी.


चॅटर्जी यांची ही जाहिरात तुफान व्हायरल झाली आहे. आयएएस आधिकारी नितीन सांगवान यांनी चॅटर्जी यांच्या जाहिरातीचा फोटो ट्विट केला आहे. ट्विट करताना सांगवान म्हणतात की, “लग्न करण्यासाठी वर / वधूंनी लक्ष द्या. लग्न करण्याचे निकष बदलत आहेत.” सांगवान यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.