18 October 2019

News Flash

साडी नेसली म्हणून सोहा अली खानवर सोशल मीडियावर टीका

सोहा आई होणार आहे

सोहाने आपला नवरा कुणाल खेमूसोबत फोटो शेअर केला होता

सोहा अली खान हिने सोशल मीडियावर आपल्या डोहाळ जेवणाचा फोटो अपलोड केला. सोहा गर्भवती आहे, तेव्हा तिच्यासाठी कुटुंबियांनी हा कार्यक्रम ठेवला होता. डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमासाठी सोहा गुलाबी रंगाची साडी नेसून  पारंपारिक पद्धतीने तयार झाली होती, या साडीत सोहा खूपच सुंदर दिसत होती. सोहाने आपला नवरा कुणाल खेमूसोबत फोटो शेअर केला होता. पण लवकरच आई बाबा होणाऱ्या या जोडप्याला आशीर्वाद देण्याएेवजी लोकांनी मात्र सोहाला साडी परिधान केली म्हणून ट्रोल करायला सुरूवात केली.

अमुक एका धर्माच्या व्यक्तींनी असे कपडे परिधान करून नये किंवा अमुक असाचा वेश परिधान करावा असं कुठेही लिहिले नाही. प्रत्येकाला आवडेल असा वेश परिधान करण्याचा अधिकार आहे. पण आपल्या इथे काही लोकांची मानसिकता फारच संकुचित असते आणि याच संकुचित मानसिकतेच दर्शन पुन्हा एकदा सोशल मीडियावर पाहायला मिळालं. ‘सोहा मुस्लिम आहे, त्यामुळे साडी परिधान करून तिने मुस्लिम धर्माचा अपमान केलाय’, ‘ती खरी मुसलमान नाही’, ‘मुस्लिम धर्म सोडून तू हिंदू झालीय का?’ अशा जोरदार टीका तिच्यावर करण्यात आल्यात. इतकंच नाही तर इन्स्टाग्रामवर सोहाला अनफॉलो करा अशाही कमेंट काहींनी केल्यात. फक्त साडी परिधान केली या एका कारणावरून तिच्यावर अनेकांनी टीका केली. पण सुदैवाने काही लोक मात्र या संकुचित मानसिकतेचे नव्हते. सोहावर टीका करणाऱ्यांचा काहींनी चांगलाच समाचार घेतलाय. प्रत्येकाला हवे तसे कपडे परिधान करण्याचा अधिकार आहे पण तरीही विचाराने आपण किती मागासलेले आहोत याचं उदाहरण इथे पाहायला मिळालं.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री फातिमा शेख हिच्यावर देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत टीका करण्यात आली होती मुस्लिम असून रमझानच्या काळात तिने बिकिनी घातली म्हणून कट्टरपंथीयांच्या रोषाला तिला सामोरे जावे लागले होते. एकूणच सोहाने साडी परिधान केली म्हणून तिला सोशल मीडियावर ट्रोल करणं किंवा तिला अनफॉलो करण्याची मागणी करणं किती योग्य आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे जरूर कळवा.

View this post on Instagram

It isn't a party without balloons 🎈! @khemster2

A post shared by Soha (@sakpataudi) on

soha-ali-comment

First Published on June 29, 2017 11:31 am

Web Title: soha ali khan trolled for wearing sari