News Flash

तोकडा स्कर्ट घातला म्हणून ‘या’ फॅशन डिझायनरला चाबकाचे फटके मारले होते

तिला ५ दिवसांसाठी तुरूंगातही डांबले होते

२०१२ मध्ये जागातील निर्भय महिलांच्या यादीत हिलरी क्लिंटन सोबत तालाच्याही नावाचा समावेश केला होता.

गेल्याच महिन्यात प्रकाशित झालेल्या ‘फॅशन इज फ्रिडम’ या पुस्तकातून चर्चेत आलेली लेखिका आणि अमेरिकेतील प्रसिद्ध स्वीमसूट डिझायनर ताला रासी हिच्या यशस्वी आयुष्याची सोशल मीडियावर त्यातूनही महिला वर्गात खूपच चर्चा होत आहे. एका १६वर्षाच्या मुलीला तोकडा स्कर्ट घातला आणि पाश्चात्य संगीत ऐकले म्हणून ५ दिवसांचा तुरुंगवास आणि दहा मिनिटे चाबकाचे फटके मारले जातात त्या यशस्वी इराणी फॅशन डिझायनर्सची ही कथा आहे. या पुस्तक प्रकाशनावेळी ताला ही १६ वर्षांची असताना सांगितला एक अनुभव सगळ्यांनाच सुन्न करुन सोडणारा होता.

सध्या अमेरिकेत स्थित असलेली ताला ही ३५ वर्षीय प्रसिद्ध अशी स्वीमसूट डिझायनर आहे. आज अमेरिकेतील अनेक भागात तसेच दुबईमध्ये देखील तिचे बुटीक आहेत. या यशस्वी फॅशन डिझानर्सने आपला प्रवास ‘फॅशन इज फ्रिडम’ या पुस्तकातून उलगडला आहे. तिच्या १६ व्या वाढदिवसादिवशी तिने तोकडा स्कर्ट घातला होता. स्कर्ट घालून ती आपल्या एका मैत्रिणीकडे पार्टीसाठी गेली होती. त्यावेळी पंचवीस तीस मित्र मैत्रिणी जमले होते. ही पार्टी सुरू असतानाच धार्मिक पोलिस येऊन त्यांनी तालाच्या हातात बेड्या ठोकल्या. तोकडा स्कर्ट घालता आणि मोठ्या आवाजात पाश्चिमात्य संगीत ऐकले म्हणून तिला पाच दिवसांसाठी तुरुंगात डांबले तसेच ४० चाबकाचे फटके देखील मारले. या प्रसंगानंतर तालाच्या कुटुंबियांनी इराण सोडले आणि अमेरिकेत स्थायीक झाले.

आजही अनेक मुस्लिक देशात महिलांनी तोकडे कपडे घालते किंवा हिजाब घातला नाही तर चाबकाचे फटके मारले जातात. तालाहिने यापूर्वी एका मासिकात लिहलेल्या लेखात या प्रसंगाचा उल्लेख केला होता त्यानंतर जगाचे लक्ष तिच्याकडे वेधले होते. २०१२ मध्ये जागातील निर्भय महिलांच्या यादीत हिलरी क्लिंटन सोबत तालाच्याही नावाचा समावेश केला होता. स्वीमसुट डिझाइन्समुळे ताला यापूर्वी वादात आली होती पण महिलांना त्यांना हवे ते कपडे परिधान करण्याचे स्वातंत्र्य आहे अशी ठाम भूमिका तिने घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 7:41 pm

Web Title: this swimsuit designer lashed for wearing a miniskirt
Next Stories
1 बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांना लग्नासाठी ४४ हजार मुलींच्या मागण्या
2 चहा सोबत बिस्किट नाही तर इंटरनेट डाटा
3 Viral : सोशल मीडियावर ‘स्लीपिंग गर्ल’ची चर्चा
Just Now!
X