News Flash

वाराणसी : रुग्णवाहिकेमध्ये सुरु होते चौघांचे अश्लील चाळे; पार्क केलेली गाडी हलताना दिसल्याने झाला भांडाफोड

तीन तरुण आणि एका तरुणीला पोलिसांनी अटक केलीय

प्रातिनिधिक फोटो (सौजन्य: रॉयटर्सवरुन साभार)

करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण पडला आहे. त्यामुळेच ऑक्सिजन बेड, औषधांबरोबरच रुग्णवाहिकांही अनेक ठिकाणी उपलब्ध नाहीत. असं असतानाच दुसरीकडे वाराणसीमध्ये एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकीकडे रुग्णांना रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसतानाच दुसरीकडे एका ठिकाणी रुग्णवाहिकेमध्येच अश्लील चाळे करणाऱ्या काहीजणांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शुक्रवारी रात्री वाराणसीमधील रामनगर येथील पडाव परिसरामध्ये सुजाबाद पोलीस चौकीजवळ एका रुग्वाहिकेमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आलीय. यामध्ये तीन तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे.

पोलिसांनी चौघांना अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे. अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार अटक करणाऱ्यात आलेल्यापैकी एकजण रुग्णवाहिकेचा चालक आहे. मंडुवाडीह येथे राहणाऱ्या या रुग्णवाहिकेच्या मालकाने १५ हजारांच्या मासिक भाड्यावर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका चालवण्याचं काम घेतलं होतं. यासाठी त्याने नगवां येथे राहणाऱ्या एका तरुणाला चालक म्हणून कामावर ठेवलं होतं. दुपारनंतर काम संपल्यावर हा तरुण कबीरचौरा येथे राहणाऱ्या आपल्या मित्राबरोबरच अन्य एक मित्र आणि एका मुलीसोबत रुग्णवाहिकेमधून शहरात फिरु लागले. हे सर्वजण रुग्णवाहिकेमधूनच सूजाबाद येथील पडावमध्ये पोहचले. येथे त्यांनी पोलीस स्थानकापासूनच हाकेच्या अंतरावर रुग्णवाहिका उभी केली आणि हे चारजण गाडीमध्ये अश्लील चाळे करु लागले.

रस्त्यावरुन जाणाऱ्यांना एका ठिकाणी उभी असणारी ही रुग्णवाहिका हलत असल्याचे लक्षात आलं. काही जणांना यासंदर्भात शंका आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी या रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडल्यानंतर त्यांना धक्काच बसला. आतमध्ये तीन तरुण आणि एक तरुणी आक्षेपार्ह अवस्थेमध्ये आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतलं आहे. रुग्णवाहिकाही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. रामनगरचे पोलीस निरिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून रुग्णवाहिका पोलिसांनी ताब्यात घेतलीय. पोलिसांनी या प्रकऱणाचा तपास सुरु केला असून रुग्णवाहिकेच्या मालकाचीही चौकशी करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 9:08 am

Web Title: varanasi ambulance standing right in front of police post three men and one girl caught inside in objectionable condition scsg 91
Next Stories
1 Cyclone Tauktae: महिलेला पावसात झाडू मारतांना पाहून आनंद महिंद्रा म्हणाले…
2 “चक्रीवादळ गुजरातला पळविण्याचा मोदी-शहांचा डाव, संजय राऊत चक्रीवादळाला मुंबईतच अडवणार”
3 “बाबा, हे मागच्या जन्मात कुठेतरी पाहिलं आहे…”; मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारयल
Just Now!
X