25 March 2019

News Flash

मुंबईतल्या आलिशान घरातून ‘विराट’ स्वप्न नगरीची झलक

विराटनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केला आहे

मुंबईतील वरळीच्या उच्चभ्रु परिसरात विराटचं आलिशान घर आहे.

‘जर तुमच्या घरातून इतकं नयनरम्य दृश्य नजरेस पडत असेल तर दुसरीकडे कोणी का जावं’ असं म्हणतं विराटनं आपल्या आलिशान घरातून स्वप्न नगरी मुंबईचं नयनरम्य दृश्य इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. गेल्यावर्षी इटलीत विवाह बंधनात अडकलेले विराट आणि अनुष्का मुंबईतल्या आपल्या आलिशान घरात राहायला आले आहेत.

२०१६ मध्ये या दोघांनीही ३४ कोटींचे एक आलिशान घर मुंबईतील एका प्रतिष्ठीत परिसरात विकत घेतले होते आणि लग्नानंतर याच आलिशान घरात राजा-राणीनं संसार थाटला आहे. काही इंग्रजी वृत्तपत्रांनी आणि संकेतस्थळांनी दिलेल्या माहितीनुसार विराटचं हे घर ७,१७१ चौरस फुटांचे आहे. ५ बीएचके, ‘सी फेसिंग व्ह्यू’ असणाऱ्या या घरातून मुंबईचं सुंदर दर्शन नजरेस पडतं. मुंबईतील वरळीच्या उच्चभ्रु परिसरात विराटचं आलिशान घर आहे.

First Published on March 9, 2018 12:14 pm

Web Title: virat kohli posted a stunning sea view from his lavish apartment