लहान मुलं म्हणजे हट्ट आलाच. आपल्याला हवी असलेली वस्तू मिळवण्यासाठी चारचौघात हंगामा करणं लहान मुलांचे जणू शस्त्रच असतं. त्यांच्या डोळ्यात एखादी वस्तू बसली की मग तिला मिळवल्याशिवाय ते काही शांत बसत नाहीत. अशाच एका लहान मुलाने चक्क पोप फ्रान्सिसच्या टोपीसाठी हट्ट केलाय. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. पोप फ्रान्सिसची टोपी मिळवण्यासाठी त्याचे हे प्रयत्न पाहून सोशल मीडियावर याची एकच चर्चा रंगलीय.

ख्रिश्चन धर्मात कॅथोलिक चर्चमधील सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याला ‘पोप’ म्हणतात. पोप हे ख्रिश्चनांचे पवित्र शहर व्हॅटिकनचे राज्याध्यक्ष आहेत. सध्या पोप फ्रान्सिस यांच्याकडे पोपचे पद आहे. २००३ मध्ये पोप बेनेडिक्ट हे XVI च्या राजीनाम्यानंतर ते पोप झाले. त्यांचे खरे नाव जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ आहे आणि ते मुळचे अर्जेंटिनाचे आहेत. सध्या सोशल मीडियावर पोप फ्रान्सिस यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. यात एक लहान चिमुकला पोप फ्रान्सिस यांची डोक्यावरील टोपी चोरताना दिसून येतोय.

गेल्या बुधवारी व्हॅटिकन सिटीमध्ये एका भव्य समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात हजारो लोक उपस्थित होते. या सोहळ्यात पोप फ्रान्सिस स्टेजवर बसले होते. त्यांच्या सुरक्षेसाठी काही लोकही त्यांच्या शेजारी बसले होते. अशात एक चिमुकला मुलगा स्टेजवर आला. हा मुलगा पोप फ्रान्सिसजवळ जाऊन त्यांच्या हात पकडून उड्या मारू लागतो. त्यानंतर त्यांच्या अवती भवती फिरू लागला. पण पोप फ्रान्सिस यांनी त्याला विरोध न करता त्याच्याशी प्रेमानेच वागताना दिसून आले. कार्यक्रम सुरू असताना हा मुलगा पोप फ्रान्सिस यांच्याजवळ हा मुलगा आलेला पाहून त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या एका व्यक्तीने त्याला आपल्या जागेवरही बसवलंय. पण हा मुलगा शांत बसण्याचं काही नाव घेत नाही.

यानंतर जो मजेदार किस्सा घडला ते पाहून सांऱ्याच्याच नजरा पोप फ्रान्सिस यांच्याकडे होत्या. या चिमुकल्या मुलाची नजर पोप फ्रान्सिस यांच्या टोपीकडे गेली. भर कायक्रमात हा मुलगा पोप फ्रान्सिस यांची टोपी काढण्याचा प्रयत्न करू लागला. वारंवार तो पोप फ्रान्सिस यांच्या टोपीला हात लावताना दिसून येतोय. पोप फ्रान्सिस यांची टोपी या चिमुकल्याला आवडली होती. त्यांच्या डोक्यावरची टोपी काढण्यासाठी वारंवार प्रयत्न करू लागतो. कधी हात लावताना दिसून येतोय, तर कधी ती टोपी खेचण्याचा प्रयत्न करतोय. या चिमुकल्या मुलाला तो टोपी हवी आहे हे लक्षात आल्यानंतर त्याचा पोप फ्रान्सिस यांच्यासारखीच एक टोपी देण्यात येते. पोप फ्रान्सिस यांच्यासारखीच टोपी आपल्याला सुद्धा मिळाली हे पाहून हा १० वर्षीय चिमुकला आनंदाने उड्या मारू लागतो. या मुलाचा हट्ट पूर्ण झाल्यानंतरच तो चिमुकला स्टेजखाली उतरतो.

हा मजेदार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यावर पोप फ्रान्सिस यांनी आपल्या भाषणात या मजेदार किस्साबाबत आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. हा मुलगा मानसिकरित्या कमजोर आहे. या मुलाच्या रूपातून देवाने हे करवून घेतलं आहे आणि त्या मुलाने सुद्धा आपल्या स्वच्छ मनाने हे केलंय. हा मुलगा लवकरात लवकर मानसिक आजारातून बाहेर यावा, अशी प्रार्थना देखील यावेळी पोप फ्रान्सिस यांनी केलीय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर या मजेदार व्हिडीओची बरीच चर्चा रंगलीय. या व्हिडीओ कमेंट्स सेक्शनमध्ये युजर्स आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरणं अवघड झालंय, तर काही जणांनी या निरागस मुलासाठी प्रार्थना केलीय. या व्हिडीओ आतापर्यंत १ लाख २२ हजार लोकांनी पाहिलाय.