Viral video: आता सणावारांना सुरुवात झाली आहे, उद्याच दसरा आहे. तर, काहीच दिवसांवर दिवाळीही आली आहे. त्यामुळे सर्वत्रच उत्साहाचं वातावरण आहे. आपल्याकडे कोणताही सण असो त्याची तयारी आधीच सुरु होते. होळी असली की आठ दिवस आधीच मुलं होळी खेळायला सुरुवात करतात. तर दिवाळी असेल तर दिवाळीच्या आधीच फटाके फोडायला सुरुवात करतात. लहान मुलांची आवडती गोष्ट म्हणजे फटाके. जास्तीत जास्त फटाके घेऊन देण्याचा हट्ट सर्वच लहान मुलं करतात. याबद्दल पालकांना मात्र फटाक्यांमुळे मुलांना इजा तर होणार नाही ना याची चिंता सतावत असते. दरम्यान अशीच एक घटना दिल्लीतून समोर आली आहे, ज्यामध्ये फटाके फोडताना एका लहान मुलाच्या डोळ्याला इजा झाली. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फटाक्यामुळे लहान मुलाला इजा

दिल्ली सरकारने फटाक्यांवर बंदी घातली असूनही लोक फटाके फोडतच आहेत. दिवाळीला अजून वेळ असला तरी फटाके फोडण्यास मुलांनी सुरुवात केलीय. दरम्यान आता दिल्लीतील शास्त्री पार्कमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी फटाके फोडल्याने एका ११ वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. याचा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल, कारण या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रहदारीचा रस्ता दिसत आहे. लोक, गाड्या रस्त्यानं ये जा करत आहेत. रस्त्यावर कोणीतरी फटाके फोडल्याने मुलाच्या एका डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसत आहे. रस्त्यावर कोणीतरी फटाके पेटवल्याची मुलाला कल्पना नसल्यामुळे तो पुढे गेला आणि फटाका फुटला. या घटनेनंतर मुलगा वेदनेनं डोळे मिटून इकडे तिकडे पळताना दिसत आहे..

गुन्हा दाखल

फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, ही घटना १५ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. फटाक्यामुळे मुलाच्या उजव्या डोळ्याला दुखापत झाली. या घटनेच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम २८६ आणि ३३७ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Video: आला अंगावर घेतलं शिंगावर; स्टंट मारणाऱ्या तरुणाला बैलानं दाखवला हिसका

दिल्लीत फटाक्यांवर बंदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलाच्या डोळ्यावर उपचार केल्यानंतर १७ ऑक्टोबरला त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आरोपीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. दिल्लीत फटाक्यांची विक्री, उत्पादन, साठवणूक, वितरण आणि फोडण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीतील प्रदूषणाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.