प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक हे प्रसिद्ध वाळू कलाकार आहेत. कला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना २०१४ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते. सुदर्शन पटनायक मूळचे ओडिशा राज्यातील आहेत. ते वाळूपासून अनेक कलाकृती बनवीत अनेकांची मने जिंकत असतात. पण, आज त्यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
सुदर्शन पटनायक यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ओडिशाच्या पुरी येथे १३ वा आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सव सुरु आहे. या महोत्सवासाठी खास आयोजन करण्यात आले आहे. समुद्रावरील वाळूत प्रत्येक स्पर्धकासाठी खास जागा तयार करण्यात आली. वाळूत सलग लाईनमध्ये रकाने बनवण्यात आले आहेत आणि त्यात प्रत्येक कलाकारांसाठी वेगळी वाळू ठेवून बाजूने स्टिलचे बांधणीकाम करण्यात आले असून समोर प्रत्येक कलाकाराने स्वतःच्या देशाचा झेंडा रोवला आहे आणि वाळूच्या मदतीने सुंदर कलाकृती सादर करत आहेत.
हेही वाचा…कासवाने केला १९१ वा वाढदिवस साजरा! गिनीज बुकनेदेखील घेतली दखल; व्हिडीओ पाहा
व्हिडीओ नक्की बघा :
व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, महोत्सवासाठी जोरदार तयारी केलेली दिसून येत आहे .प्रवेशद्वारावर आतापर्यंतच्या वाळू महोत्सवाचे काही फोटोज पोस्टरवर लावण्यात आले आहेत. देश-विदेशातील अनेक कलाकार या महोत्सवात सहभागी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सव पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना बसण्यासाठी खुर्च्या-टेबलची सोय सुद्धा करण्यात आली आहे. तसेच या वाळू महोत्सवात एकंदरीतच ११८ कलाकार सहभागी झाले आहेत.
सोशल मीडियावर ही पोस्ट सुदर्शन पटनायक यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) @sudarsansand अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आहे. त्यांनी या खास महोस्तवाहाची एक झलक व्हिडीओद्वारे दाखवली आहे . तसेच ‘ओडिशातील #कोनारक, पुरी येथे १३वा #आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सव १ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या महोत्सवात ११८ कलाकार सहभागी झाले आहेत व हा महोत्सव ५ डिसेंबरपर्यंत चालू राहील ; असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे.