scorecardresearch

Premium

जमिनीवरून दोन गटांत वाद अन् तीन जेसीबी एकमेकांत भिडल्या; Video पाहून युजर्स म्हणाले…

एका जमिनीवरून दोन प्रतिस्पर्धी कंपन्यांचा एकमेकांमध्ये वाद सुरू होता. या घटनेच्या दिवशी एका कंपनीची जेसीबी सर्वप्रथम जमीन खोदण्यासाठी आली. काही वेळातच दुसरी कंपनीही जेसीबी घेऊन पोहोचली.

3 jcb fight with each other video goes viral people call sasta transformers
जमिनीवरुन दोन गटात वाद अन् तीन जेसीबी एकमेकांत भिडल्या; Video पाहून युजर्स म्हणाले… (photo – fakta.indo instagram)

आजच्या काळात जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. पूर्वीचे लोक इतरांना त्यांच्या वाट्याच्या जमिनीत रस्ता बांधायला देत होते; पण आता इंचभर जमिनीसाठीही वाद होताना दिसतात. अनेकदा हे वाद इतके टोकाला जातात की, गोष्टी हाणामारीपर्यंत पोहोचतात. लोक संपत्ती खरेदी करण्यासाठी आयुष्यभराची बचत खर्च करतात. अशा परिस्थितीत जमिनीबाबत अनेक लोकांमध्ये वाद होताना दिसतात. जेव्हा अनेक लोक जमिनीच्या तुकड्यावर दावा करतात तेव्हा प्रकरण अगदी मारामारीपर्यंत पोहोचते. जमिनीच्या वादाचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; पण हा वाद व्यक्तींमध्ये नाही तर चक्क जेसीबी मशीनद्वारे सुरू आहे.

जमिनीवर खोदकाम करण्यावरून यात वादाला सुरुवात झाली; पण या वादाचा व्हिडीओ एका खास कारणासाठी व्हायरल होत आहे. कारण- यात तुम्हाला हाताने नाही तर जेसीबीने मारामारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तीन जेसीबी जमिनीवर एकमेकांशी भिडताना दिसल्या.

sebi summons many former directors in financial irregularities in zee
‘झी’मधील आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीचा विस्तार;‘सेबी’कडून कंपनीच्या अनेक माजी संचालकांना समन्स
SpiceJet Sky One Two companies bid to revive the bankrupt Go First company print eco news
दिवाळखोर ‘गो फर्स्ट’साठी स्पाईसजेट, स्काय वन मैदानात; आर्थिक चणचणीमुळे नोकरकपात करणाऱ्या अजय सिंग यांची नव्या कंपनीसाठी बोली
Delhi Salon firing shot dead २
दिल्लीतल्या सलूनमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, दोघांची हत्या, CCTV VIDEO व्हायरल
A woman saree stuck in the wheel of a two-wheeler a cleaning worker help them Uncle's humanity won everyone's heart Viral Video
दुचाकीच्या चाकात अडकला महिलेचा पदर, सफाई कर्मचाऱ्याने केली मदत; काकांच्या माणुसकीने जिंकले सर्वांचे मन!

ही घटना इंडोनेशियातील सुमात्रा येथील आहे. त्यात एका जमिनीवरून दोन प्रतिस्पर्धी कंपन्यांचा एकमेकांमध्ये वाद सुरू होता. या घटनेच्या दिवशी एका कंपनीची जेसीबी सर्वप्रथम जमीन खोदण्यासाठी आली. काही वेळातच दुसरी कंपनीही जेसीबी घेऊन पोहोचली. सुरुवातीला काही वेळ दोन व्यक्तींमध्ये वाद झाला. नंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले, त्यानंतर दोन्ही कंपन्यांनी जमिनीसाठी चक्क जेसीबीद्वारे फायटिंग सुरू केली.

हा व्हिडीओ @fakta.indo या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे; जो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, हे स्वस्त ट्रान्स्फॉर्मर्स आहेत. या फायटिंगचा निकाल काय लागला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या लढतीत तिन्ही जेसीबींचे मोठे नुकसान झाले असेल, हे स्पष्ट झाले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 3 jcb fight with each other video goes viral people call sasta transformers sjr

First published on: 29-11-2023 at 12:06 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×