नृत्यासाठी वयाचे बंधन नाही. नाचायची इच्छा असेल तर वृद्ध वयात हाडे देखील खंबीरपणे साथ देतात, याचा प्रत्यत एका व्हायरल व्हिडिओतून आला आहे. यात ८२ वर्षांचे आजोबा बादशाहच्या गाण्यावर नाचत असल्याचे दिसून येत आहे. बादशाहचे ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या ‘खुबसुरत’ चित्रपटातील गाण्यावर आजोबांनी भन्नाट डान्स करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

इन्स्टाग्रामवर निगम पटेल यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या छोट्या क्लिपमध्ये ८२ वर्षीय आजोबा ‘पार्टी शुरू हुई है’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. आजोबा जोशात हातपाय हालवत नाचताना दिसत आहे. त्यांच्या नृत्याचे कौतुक होताना दिसत आहे. इतरांच्या तुलनेत त्यांचा नाचण्याचा स्पीड आणि जोश उच्च पातळीवर आहे. व्हिडिओच्या शेवटी निगम यांनी आजोबांचे कौतुक केले. ‘आय लव्ह धिस गाय’ असे म्हणून त्यांनी आजोबांचा उत्साह वाढवला.

(४८ तासात १३८ वेळा थांबले हृदयाचे ठोके; अ‍ॅपल वॉचने वाचवला तरुणाचा जीव)

हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यास ८ लाख व्ह्यूज मिळाले आहे. आजोबांचा जोश पाहून नेटकरी थक्क झाले आहे. नेटकऱ्यांनी व्हिडिओवर भरभरून कमेंट्स केले आहेत. आजोबांवर कौतुकांचा वर्षाव केला आहे. या आजोबांसारखे ८२ व्या वर्षी नाचण्यासाठी मी जीमला जाणार, असे एका नटकऱ्याने कमेंट केले आहे.

हा व्हायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नाचण्याच्या इच्छेआड वय येऊ शकत नाही, असेच यातून कळत आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. आजोबांचा उत्साह आणि त्यांनी गाण्यावर धरलेला ठेक्याची प्रशंसा होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर आनंद महिंद्रांनी घेतली शपथ; म्हणाले “यापुढे मी कधीच…”)