Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ तर अंगावर काटा आणणारे असतात. तुम्ही रस्त्यावर स्टंट करणारे अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुमचा थरकाप उडेल. या व्हिडीओमध्ये एक मुलगा दुचाकीच्या सीटवर उभा होऊन दुचाकी चालवताना दिसत आहे. सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियावर अनेक जण स्टंट करतानाचे व्हिडीओ शेअर करतात. काही लोकांना स्टंट करणे आवडते पण अनेकदा स्टंट करणे महागात सुद्धा पडते. या व्हायरल व्हिडीओमध्ये हा मुलगा ज्या पद्धतीने दुचाकीच्या सीटवर उभा राहून दुचाकी चालवत आहे, ते पाहून तुमच्याही अंगावर शहारा येईल.

mango-pav
मँगो पाव? विचित्र रेसिपी पाहून चक्रावले नेटकरी, व्हिडीओ होतोय व्हायरल!
Dadar Poster Make MI & Modi Fans Crazy
“निवडणूकीत देशाचा कर्णधार बदलून…” ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा खुलेआम प्रचार; MI चे चाहते म्हणतात, बरोबर!
Watch Fighting cows go on rampage in Delhi locality
भररस्त्यात राडा! दोन गायींमध्ये जुंपली झुंज, पायाखाली तुडवल्या गेल्या मुली……पाहा थरारक Viral Video
king cobra viral video big king cobra regurgitating three other snakes shocking video goes viral
महाकाय किंग कोब्राने झटक्यात गिळले तीन विषारी साप; उलटी होताच…; अंगावर काटा आणणारा थरारक VIDEO व्हायरल
a Girl Called her Boyfriend to meet him but Got Caught by his Mother instead
VIDEO : बॉयफ्रेंडला भेटायला बोलावणे तरुणीला पडले महागात, मुलाच्या आईचा भर रस्त्यात राडा, व्हायरल होतोय व्हिडीओ
How to cut challan while driving on road traffic police video
हेल्मेट न घालता गाडी चालवता? बघा पोलीस एकाचवेळी अनेकांचे ऑनलाईन चलान कसे कापतात; VIDEO पाहून बसेल धक्का
an old lady dance on 90s famous song
90’s च्या गाण्यावर आजीने केला भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल
brazil floods woman reunites with pet dog heartwarming video
भीषण पूरस्थितीतील मन हेलावणारे दृश्य, हरवलेल्या श्वानाला पाहून महिला धाय मोकलून रडली; भावूक VIDEO व्हायरल
Dangerous Protest Viral Video Claims Muslim Killed Cow But Reality Is Major
Video: गायीचा मृतदेह जीपला बांधून भीषण आंदोलन; मुस्लिमांनी गोहत्या केल्याचा दावा, भयंकर घटनेची संपूर्ण खरी बाजू वाचा

या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक मुलगा भररस्त्यावर दुचाकी चालवत आहे पण त्याची दुचाकी चालवण्याची पद्धत पाहून कोणीही अवाक् होईल. दुचाकीच्या सीटवर उभा राहून तो दुचाकी चालवतोय. व्हिडीओमध्ये समोरुन ट्रक येताना दिसत आहे. तरीसुद्धा तो बिनधास्तपणे रस्त्याच्या एका बाजूला दुचाकी चालवत आहे. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही. जर या मुलाचा थोडा जरी तोल गेला तरी याचा जीव जाऊ शकतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : VIDEO : काय सांगता! पोपट चक्क सायकल चालवतोय; विश्वास बसत नाही, एकदा व्हायरल व्हिडीओ पाहाच

ChapraZila या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आता यमराज झोपला आहे त्यामुळे वाचला” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “या मुलाने तर सुपरहिरोला पण फेल केलं” तर एका युजरने लिहिलेय, “यमराज होळी खेळत आहे आणि हा मृत्यूशी खेळत आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा मुलगा विसरला आहे की आयुष्य एकदाच मिळतं” काही लोकांनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे. एक लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून सध्या खूप व्हायरल होत आहे.