Video : रक्षाबंधननिमित्त सोशल मीडियावर बहिणभावांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बहिण भावाच्या नाते हे जगावेगळे असते. हे कधी भांडतात तर कधी प्रेमाने वागतात. कधी कधी तर एकमेकांसाठी इतरांबरोबर लढतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बहिणीची भीती घालवण्यासाठी भाऊ कुत्र्यांना पळवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांच्या बालपणीची आठवण येऊ शकते.

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोघे बहिण भाऊ शाळेतून घरी परत येत असतात. अचानक वाटेत दोन कुत्रे दिसतात तेव्हा बहिण भीतीपोटी भावाच्या मागे लपते तेव्हा बहिणीची भीती घालवण्यासाठी भाऊ काठीने धाक दाखवत कुत्र्यांना पळवतो.

हेही वाचा : उखाणा घ्यावा तर असा … आजीने घेतला सुंदर खानदेशी उखाणा; व्हिडीओ एकदा पाहाच

कुत्रे पळताच बहिणीचा आनंद गगनात मावेनासा होतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या बहिण भावासह शाळेत जातानाचे दिवस आठवतील किंवा काही जणांना त्यांचे बालपण आठवतील.

arun_dj5 या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युदर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने लिहिले, “भावाने कुत्र्याला पळवताच चिमुकलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहा” तर एका युजरने लिहिले, “मला भटक्या कुत्र्यांचा खूप वाईट अनुभव आलेला आहे.” आणखी एका युजरने लिहिले, “बहिण भावाचे प्रेम”