Viral Video : सोशल मीडियावर शाळेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी विद्यार्थी एखादी कला सादर करताना दिसतात तर कधी मजा मस्ती करताना दिसतात. हे व्हिडीओ पाहून अनेकदा शाळेच्या दिवसांची आठवण येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक विद्यार्थीनी शास्त्रीय नृत्य सादर करताना दिसत आहे. तिचे नृत्य सादरीकरण पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
हा व्हायरल व्हिडीओ एका कॉलेच्या वर्गखोलीतला आहे. या व्हिडीओ एक कॉलेजची विद्यार्थीनी शास्त्रीय नृत्य करताना दिसत आहे. तिच्या आजुबाजूला बाकावर अन्य विद्यार्थीनी बसलेल्या आहेत. मेरे ढोलना सुन या लोकप्रिय गाण्यावर ही चिमुकली नृत्य सादर करताना दिसते. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही भारावून जाईल. ती खूप सुंदर नृत्य करताना दिसत आहे. तिच्या डान्सवर अन्य विद्यार्थीनी टाळ्या वाजवत तिला प्रोत्साहन देताना दिसत आहे. जगतजीत इंटर कॉलेज इकौना श्रावस्ती येथील ही विद्यार्थीनी आहे.
हेही वाचा : Nagpur Tarri Pohe : नागपूरचे तर्री-पोहे! झणझणीत तर्री घातलेले पोहे कसे बनवले जातात, पाहा VIDEO
jjic_ikauna_shravasti_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जेआयसी इकौना श्रावस्ती” या व्हिडीओवर युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात खरी नृत्यकला” तर एका युजरने लिहिलेय, “हीच आपली संस्कृती..” आणखी एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात डान्स, खूप सुंदर”