Viral Video : सध्या सगळीकडे लग्नसराई सुरू आहे. सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होत आहे. अशात अनेक हटके लग्नाच्या पत्रिका सुद्धा चर्चेत येत आहे. सध्या अशीच एक लग्नाची पत्रिका व्हायरल होत आहे. या पत्रिकेमध्ये पाहूण्यांसाठी तब्बल १५ नियम लिहिले आहे. हे नियम वाचून तुम्हीही डोकं धराल. सध्या ही लग्नाची पत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे.
पाहूण्यांसाठी लग्नाच्या पत्रिकेत लिहिले १५ नियम
लग्नाची पत्रिका देऊ लग्नात पाहू्ण्यांना अतिशय मान सन्मानाने आमंत्रित केले जाते. लग्नाच्या पत्रिकेत वेळ, दिवस, तारीख आणि कार्यक्रमांची यादी दिली जाते. कोणता कार्यक्रम केव्हा आहे, याविषयी सविस्तर माहिती दिली जाते. आग्रहाच निमंत्रण म्हणून नवरदेव नवरीला आशीर्वाद देण्यासाठी पाहूण्यांना बोलावतात. लग्नात येणाऱ्या पाहूण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याबाबत काळजी घेतली जाते. खरं तर अनेकदा लोक आपल्या लग्नाला विस्मरणीय करण्यासाठी पाहूण्यांना हटके सुविधा पुरवतात पण सध्या व्हायरल होणाऱ्या या लग्नाच्या पत्रिकेत पाहूण्यांनी अनुकरण करावे असे १५ नियम सांगितले आहे. हे नियम वाचून तुम्हीही अवाक् व्हाल.
वाचा १५ नियम
१. हे लग्न (नवरदेवाचे नाव) आणि नवरीचे नाव यांचे आहे. तुमचे नाही.
२. फोटोग्राफरला त्याचे काम करू द्यावे. त्यात अडथळा आणू नये.
३. आउटफिट काळा आणि सोनेरी आहे. लाल, निळा, हिरवा किंवा पांढरा अजिबात नाही.
४. सीटला पुन्हा अरेंज करू नये. आण्ही सीटिंग चार्ट काही कारणास्तव तयार केलेला आहे.
५. तुम्ही लग्नासाठी कोणताही पैसा लावलेला नाही. त्यामुळे जे आहे ते आपल्याजवळ ठेवा. तुमचे मत व्यर्थ आहे.
६. पिताना सयंम बाळगा.
७. प्रपोजल किंवा कोणत्याही प्रकारची अनाउसमेंट होणार नाही.
८. संगीत आवडले नाही तर थेट घरी जा.
९. हा ९९ आणि २००० मध्य जन्मणाऱ्यांचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे यामध्ये ट्वर्किंग असणार.
१०. लग्नाचे फोटो पोस्ट करताना हॅशटॅग वापरायला सांगितला आहे.
११.संपूर्ण रात्रभर बसू नका
१२. बाहेरून दारू आणू नये. पकडल्यानंतर बाहेर घेऊन जाणार.
१३. पहिल्या नियमाचे पालन करा
१४. नवरदेव आणि नवरीने जे म्हटले तेच खरं.
१५. वरचे नियम नीट पाहा.
पाहा व्हायरल फोटो
weddingshaming या रेडिट अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” जर मला कोणी हे पाठविले तर मी अजिबात जाणार नाही” या फोटोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ही कसली लिस्ट आहे, मी पाहून गोंधळलो.” तर एका युजरने लिहिलेय, “ते लग्न करण्यासाठी पूर्णपणे मॅच्युअर झाले असे वाटत नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे खरंय. मला विश्वास बसत नाही.”