गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सर्वांना गणरायाच्या आगमानाचे वेध लागले आहे. बाजारात सुंदर गणेश मुर्ती आल्या आहेत, सजावटीचे सामनाने दुकाने सजली आहे. ढोल-पथकांची जोरदार तालीम सुरू आहे. सोशल मिडियावर गणरायाच्या स्वागतामध्ये असलेल्या अनेक भक्तांचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. चिमुकल्या भक्तांनाही लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता असते. दरम्यान सध्या एको चिमुकल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

‘आमच्या पप्पांनी गणपती आणला” या गाण्यावर एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्ही थक्क होऊ जाल. चिमुकल्यांनी इतक्या सुंदरपणे हा अभिनय केला आहे की तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. विशेषत: गाण्यातील ”टुकुमुकु बघतोय चांगला” या ओळीवर त्याने जो अभिनय केला आहे तो फार गोंडस आहे. लोकांना व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला आहे. गणरायाच्या आगमानाच्या उत्सुकता त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही पाहू शकता. या चिमुकल्याचे नाव साईराज आहे. साईराजच्या वडिलांनी गणेश केंद्रे यांनी हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा – केरळची कासवू साडी नेसून स्केटिंग करत चिमुकलीने दाखवला ‘ओणम स्वॅग’! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल तिचे फॅन

हेही वाचा – रस्त्यावर पैशांचे पाकीट पडले समजून उचलायला गेली महिला; बघितलं तर…. व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावून जाल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान हा व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिला आहे तर अनेक जण व्हिडीओवर कमेंट करत आहे. एकालिहिले, ”टुकुमुक बघतोय चांगला; किती छान अक्टिंग करतो” तर दुसऱ्याने लिहिले, ”किती ही बघितल तर मन नाही भरत बाळा” तर तिसऱ्याने लिहिले, ”व्वा व्वा व्वा व्वा व्वा व्वा व्वा… अरे बाळा कित्ती गोड… खूप खूप मनापासून आशीर्वाद ” तर आणखी एकाने लिहिले, ”खुप सुंदर बाळा, अतिसुंदर असे मनमोहक सादरीकरण करून गणरायाचे आगमन केलेस तु बाळा”