Viral Video: रक्षाबंधनापूर्वी भाऊ-बहिणीचा गोंडस व्हिडीओ झाला व्हायरल; तुम्हालाही आठवतील लहानपणीचे दिवस

रक्षाबंधन सणाच्या आधी भाऊ- बहिणीचा एक गोंडस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच सुंदर हास्य येईल.

Viral Video: रक्षाबंधनापूर्वी भाऊ-बहिणीचा गोंडस व्हिडीओ झाला व्हायरल; तुम्हालाही आठवतील लहानपणीचे दिवस
photo(twitter/viralposts5)

भाऊ-बहिणीचं नातं हे खूप सुंदर आणि प्रेमळ असतं. कारण, त्यांच्यात कितीही भांडणे झाली तरी या दोघांना एकमेकांशिवाय राहणे जमत नाही. जेव्हा जेव्हा भाऊ संकटात असतो तेव्हा बहीणच त्याची मदत करून त्याची ढाल बनून उभी असते. त्याच वेळी, भाऊ देखील आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतो. ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे. त्याआधीच, एका भावा आणि बहिणीचा एक अतिशय गोंडस व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून तुमचाही दिवस आनंदात जाईल.

रक्षाबंधनाच्या सणाआधी सोशल मिडीयावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हास्य येणार आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही मुले जमिनीवर बसून अभ्यास करत आहेत किंवा काही काम करत आहेत. या दरम्यान, त्याची लाडकी बहीण त्याची खूप काळजी घेत आहे. व्हिडीओमध्ये तहान लागल्यावर बहिण भावांना प्रेमाने पाणी देताना दिसत आहे. मुलीचा गोंडसपणा लोकांची मने जिंकत आहे.

( हे ही वाचा: VIRAL VIDEO : कुत्रा आणि साप यांच्यातील भयानक झुंज तुम्ही पाहिली आहे का? पहा हा व्हायरल व्हिडीओ)

येथे पहा भाऊ आणि बहिणीचा गोंडस व्हिडीओ

भाऊ आणि बहिणीचा हा अतिशय गोंडस व्हिडीओ ट्विटरवर @ViralPosts5 या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले, awww sister love ! लोकांना हा व्हिडीओ एवढा आवडला आहे की त्यांनी या व्हिडीओवर लाइक्सचा वर्षाव केला आहे. अवघ्या ३० सेकंदांचा हा व्हिडीओ असून हा व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहण्यास सोशल मिडीया यूजर्स पसंती दर्शवत आहे. या भाऊ- बहिणीच्या व्हिडिओला आतापर्यंत ६५ हजारांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. त्याच वेळी, व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

( हे ही वाचा: Kerala:कौतुकास्पद! मुस्लिम विद्यार्थ्यांनी जिंकली रामायण प्रश्नमंजुषा स्पर्धा)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे की, हा खूप क्यूट व्हिडिओ आहे. बहिणींमधून अनेकदा त्यांच्या आईचे दर्शन होते. ती नेहमी भावाची काळजी घेते. त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट करत लिहिले आहे की, ‘भाऊ आणि बहिणीचे नाते अनोखे असते.अजून एका युजरने कमेंट करत लिहिले, ‘खूप क्यूट.’ एकूणच या व्हिडीओने लोकांचा दिवस बनवला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A cute video of brother and sister went viral before rakshabandhan gps

Next Story
स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी ध्वजावंदनात असतो ‘हा’ मोठा फरक; UPSC च्या मुलाखतीत फक्त दोघांना जमलं उत्तर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी