Viral Video : सोशल मीडियावर कुत्र्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा भर दिवसा मालकीणीसमोरुन त्याच्या मैत्रीणीला म्हणजेच एका कुत्रीला पळवून नेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

कुत्रा हा माणसाचा अत्यंत जवळचा आणि प्रिय प्राणी आहे. यामुळे अनेक जण आवडीने कुत्रा पाळताना दिसून येतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली तिच्या पाळीव कुत्रीला दोरीने बांधून रस्त्याने जात असते. व्हिडीओत तु्म्हाला दिसेल की त्यांच्या मागून अचानक एक कुत्रा येतो आणि तिच्या हातची दोरी ओढतो आणि कुत्रीला पळवून घेऊ जातो. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हे पाहून चिमुकली कुत्र्यामागे धावताना दिसते. ही अनोखी मैत्री पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : लहानपण देगा देवा.. मित्रांना बैल बनवून लावली बैलगाडा शर्यत, पाहा व्हायरल व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

mariya____03 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मजेशीरपणे लिहिलेय, “मुलगा सर्वांसमोर मुलीला पळवून घेऊन गेला.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “या प्रेमाला काय नाव देऊ” तर एका युजरने लिहिलेय, “मैत्री असावी तर अशी” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून पोट धरुन हसायला आले”