Viral Video : सध्या टोमॅटो स्वस्त झाले आहेत, पण काही महिन्यांपूर्वी टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना टोमॅटो खरेदी करणे कठीण झाले होते. दरम्यान, सोशल मीडियावरही टोमॅटोवर अनेक मिम्स, व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यातलाच एक जुना व्हिडीओ आता पुन्हा चर्चेत आला आहे. या व्हिडीओत कुत्र्याने चक्क टोमॅटो लपवलेले दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला कुत्रा निवांत झोपलेला दिसेल. पुढे व्हिडीओत दिसते की, एक महिला हळूहळू कुत्र्याच्या तोंडातून एक-एक टोमॅटो बाहेर काढताना दिसत आहे. सुरुवातीला कुत्र्याला पाहून कोणाला वाटणार नाही की कुत्र्याने १०-१५ टोमॅटो तोंडात लपवून ठेवले असतील, पण महिला एक-एक करून चक्क १०-१५ टोमॅटो कुत्र्याच्या तोंडातून बाहेर काढताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : VIDEO : कलेला तोड नाही! तरुणाने चक्क गुळापासून रेखाटलं शिव-पार्वती आणि गणपती बाप्पाचं चित्र, व्हिडीओ एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

vikramgoyal1997 या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “किती गोंडस चोर आहे… कृपया त्याला शिक्षा करू नका”; तर एका युजरने विचारले, “आता हे टोमॅटो तुम्ही वापरणार आहात की फेकून देणार?” आणखी एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “बापरे, कुत्र्याने तर कोटींचा माल लपवला होता…”