Viral video: सोशल मीडियाचे जग मजेदार फोटो आणि प्राण्यांच्या व्हिडिओंनी भरलेले आहे. ज्या लोकांना प्राण्यांची खूप आवड आहे, ते अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर बघण्यात घालवतात. असे लोक पाळीव प्राण्यांना घरातील सदस्य मानतात आणि त्यांना सांभाळतात. तर असेही काही लोक आहेत जे या मुक्या प्राण्यांना त्रास देण्याचा आनंद घेतात. अशाच एका ठिकाणी चक्क जिवंत कुत्र्याला जमीनीत पूरलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहू सगळेच संतापले आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका शेतात जिवंत कुत्र्याला अक्षरश: पूरलं आहे. जमिनीच्या आतून आवाज येत असल्यानं जमीन खोदायला घेतली चर आतमध्ये चक्क जिवंत कुत्रा विव्हळताना दिसला. आपला जीव वाचवण्यासाठी या कुत्र्याची धडपड सुरू होती मात्र त्याला खड्यातून वर येता येत नव्हतं. त्याच्या अंगावर मातीचा ढिग असल्यामुळे तो आतमध्येच अडकून राहिला. एका तरुणामुळे मात्र या कुत्र्याला वाचवता आलं, या व्हिडीओमध्ये दिसत आहे माती बाजूला करुन या कुत्र्याला बाहेर काढलं, मात्र कुत्र्याची अवस्था अतिशय बिकट दिसत आहे, त्याला उंभही राहता येत नाहीये. अतिशय क्रूरपणे हा प्रकार करण्यात आला आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ maharastrin_top_models नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया दिलीय, “घाबरु नको शेवटी इथेच फेडायचं आहे तुला, देवापेक्षा कर्म मोठे आहेत भाऊ हिशोब होणार” तर दुसरा एक म्हणतो, “एक वेळ देव माफ करेल पण कर्म प्रत्येक पापाचं हिशोब ठेवतो” दुसरा म्हणतो “लोक आता कर्मालाही घाबरत नाही” तिसऱ्या एकानं, “ज्याने कुणी हे असं केलं, एकदिवस नक्कीच त्याच्याकडे कर्म फिरून येईल. फक्त आल्यावर विचारू नको हे असं का होतंय..” तर आणखी अकानं “का रे तुमचं काय वाईट केलय त्या मुक्या प्राण्याने…” “खूपच खालच्या पातळीवार जातात आज काल लोक” अशा वेगवेगळ्या संतापजनक प्रतिक्रिया लोक देत आहेत.