scorecardresearch

Premium

बापलेकीचं नातं जगावेगळं असतं! वडिलांबरोबर चिमुकली करतेय तुफान मस्ती, VIDEO एकदा पाहाच

सध्या असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत चिमुकली चक्क वडिलांबरोबर मजा मस्ती करताना दिसत आहे.

a father and daughter enjoying company
बापलेकीचं नातं जगावेगळं असतं! वडिलांबरोबर चिमुकली करतेय तुफान मस्ती, व्हिडीओ एकदा पाहाच (Photo : Instagram)

सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा पालक स्वत: मुलांचे व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत चिमुकली चक्क वडिलांबरोबर मजा मस्ती करताना दिसत आहे.
दिवसभर लहान बाळ हे आई आणि घरच्यांबरोबर असते पण जेव्हा वडील कामातून वेळ काढून या चिमुकलीबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतात, मजा मस्ती करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तिला किती आनंद होतो, हे या व्हिडीओतून तुम्हाला दिसेल.

या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चिमुकलीसमोर तिचे वडिल बसले आहे आणि ती निवांत आपल्या वडिलांबरोबर खेळताना दिसत आहे. वडिलांबरोबर मजा मस्ती करताना इतका आनंद होतो की तिला खळखळून हसायला येते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही बालपण आठवेल. बापलेकीची ही जोडी पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

kids dance video
“…इत्ता सा टुकडा चाँद का”; चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हावभाव अन् डान्स स्टेप्स पाहाच, डान्स व्हिडीओ व्हायरल
youth stunt running vehicle pimpri
पिंपरीत धावत्या गाडीच्या टपावर बसून तरुणाची स्टंटबाजी; तरुणाचा पोलीस घेत आहेत शोध!
a husband dance with wife sitting on wheelchair emotional video goes viral
“नवरा असावा तर असा!” व्हीलचेअरवर बसलेल्या पत्नी बरोबर केला सुंदर डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
An heart touching video
वडिलांचे प्रेम कधीच दिसत नाही! वडिलांना कडकडून मिठी मारत ढसाढसा रडताना दिसले विद्यार्थी, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा : गणेशोत्सवानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर भाविकांची तुडूंब गर्दी; व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच…

krishagoswami2225 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बापलेकीसमोर सर्व काही फेल आहे”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरंय, लहान मुलं वडिलांबरोबरच खुश असतात.” तर एका युजरने लिहिलेय, “माझी चिमुकलीपण तिच्या बाबांबरोबर अशीच मजा मस्ती करते” आणखी एका युजरने लिहिलेय, “चिमुकलीचे हसू पाहून वडिलांचा दिवसभराचा थकवा दूर होत असावा”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A father and daughter enjoying company and doing fun video goes viral ndj

First published on: 20-09-2023 at 13:09 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×