महिलांबरोबर अश्लील कृत्ये करण्यासंबंधीची अनेक प्रकरणे समोर येत असतात. आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका १४ वर्षांच्या मुलानं त्याच्या कुटुंबासमोर एका तरुणीच्या छातीवर स्पर्श करून तिला ढकलून दिलं. त्यावर त्या मुलाचं कुटुंब तो लहान आहे, असं सांगून प्रकरण टाळण्याचं प्रयत्न करीत असतं. पण, मुलगी त्याविरोधात मुलाचे शेजारी आणि त्याच्या कुटुंबासोबत जोरदार वाद घालते. तसेच स्वतःच्या मुलाला पाठीशी घालणं किती चुकीचं आहे हे वारंवार सांगताना दिसते.

प्रकरण असं आहे की, एक १४ वर्षाचा मुलगा एका तरुणीच्या छातीवर स्पर्श करून, तिला धक्का देतो. त्यावर त्याचे पालक तो फक्त १४ वर्षांचा आहे, असं सांगून प्रकरण निवळावं यासाठी प्रयत्न करताना दिसतात. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी १४ वर्षांच्या मुलाच्या कुटुंबातील सदस्यांशी वाद घालत असते. तसेच मुलाची आई या संवादादरम्यान त्या तरुणीबद्दल अयोग्य टिप्पणी करते. तसेच मुलाच्या वडिलांसमोर मोठ्या आवाजात संवाद साधल्यामुळे प्रकरण आणखीन वाढत जाते. तसेच एक शेजारची मुलगी तरुणीला समजावत असते आणि तो फक्त १४ वर्षांचा आहे आणि येतो लहान मुलांना राग, असं वारंवार तरुणीला सांगते. पण, तरुणी हे अगदीच चुकीचं आहे, असं तिलादेखील स्पष्ट शब्दांत सांगते. व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…दिवाळीनिमित्त ऑनलाईन शॉपिंग करताय? मग जरा थांबा, तुमच्याबरोबरही होऊ शकतो असा स्कॅम; पाहा Video

व्हिडीओ बघा :

त्यानंतर तरुणी व्हिडीओत त्या १४ वर्षांच्या मुलाचा चेहरा दाखवते आणि त्यानं सगळ्यांसमोर माझ्या छातीवर स्पर्श करून मला ढकललं, असं सांगते. तर तो १४ वर्षांचा मुलगा व्हिडीओत आपली काहीच चूक नाही, असं दाखवत न घाबरता संवाद साधताना दिसतो. हे पाहून मुलाच्या कुटुंबातील सदस्य आणि काही मित्र त्याचा चेहरा लपवून, त्याला लांब घेऊन जातात. पण, या सगळ्यात मुलगी एकटीच या सगळ्यांमध्ये स्वतःसाठी लढत, या प्रकरणाचा व्हिडीओ शूट करीत आपली बाजू मांडताना दिसते. पण, मुलाच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांचाच मुलगा योग्य आहे, असे वाटत असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या मुलानं घरच्यांसमोर एका तरुणीच्या छातीला हात लावत तिला ढकलून दिलं; परंतु त्याच्या कुटुंबातील सदस्य आपला मुलगा लहान आहे, असं वारंवार सांगून प्रकरण टाळत आहेत, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी या तरुणीची बाजू घेताना आणि या प्रकरणाची चर्चा करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.