Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ किंवा व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ किंवा फोटो खूप संतापजनक असतात. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की सार्वजानिक ठिकाणी एका लिफ्टमध्ये पान खाऊन थुंकून भिंत खराब केलेली दिसत आहे. हा फोटो पाहून कोणीही संताप व्यक्त करेन.

भारतात अनेक ठिकाणी काही लोकं सार्वजानिक ठिकाणी घाण करताना दिसून येतात. यात पान खाऊन थुंकणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. तुम्ही अनेकदा सार्वजानिक ठिकाणी पाहिले असेल की लोकं थुंकून भिंत खराब करतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की एका लिफ्टच्या भितींवर पान थुंकून लोकांनी लिफ्ट अस्वच्छ केली आहे. Deepak Kumar Vasudevan या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भोपाल रेल्वे स्टेशनवरील लिफ्ट #स्वच्छतापक्वाडा” या पोस्टमध्ये त्यांनी रेल्वे मंत्री, रेल्वे स्टेशन आणि भोपाल विभागच्या एक अकाउंटला टॅग केले आहे.

ही पोस्ट रेडिटवरील r/IndiaSpeaks या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “हे समजून घ्यायला लोकांना अजून १०० वर्ष लागतील” तर एका युजरने लिहिलेय, “सार्वजानिक ठिकाणी पान गुटखा खाणे बंद केली पाहिजेत.” आणखी अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे.

A lift at Bhopal Railway Station
byu/Tam_Pishach inIndiaSpeaks

हेही वाचा : धक्कादायक! मद्यपान करून शिक्षकाने सरकारी शाळेत लावली हजेरी, म्हणाला “मी रोज पितो..”; पाहा व्हायरल VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२२ मध्ये लोकांनी सार्वजानिक ठिकाणी थुंकू नये, यासाठी रेल्वे कडून एक पोस्टर व्हायरल झाले होते. या पोस्टरवर १९७५ च्या चित्रपटातील एक लोकप्रिय डायलॉगचा वापर केला होता.
या पोस्टरवर अमिताभ बच्चन आणि शशी कपूरचे चित्र काढले आहे. पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन म्हणतात, “मेरे पास रेलगाडी है, रिजर्व टिकट है तेरे पास क्या है” त्यावर शशी कपूर म्हणतात, “मेरे मुह में पान है” त्यानंतर खाली मोठ्या अक्षरात खबरदार लिहिलेले आहे. आणि त्या खाली लिहिलेय, “‘दीवार’ पर इधर उधर मत थुकना. वर्ना ५०० रुपये लगेगा जुर्माना”