Viral Video : असं म्हणतात, परिस्थिती माणसाला जगणं शिकवते. परिस्थितीनुसार माणसाला वागावं लागतं. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती नळ्याच्या पाण्याने पोळी भिजवून खाताना दिसतेय. व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर व्हिडीओ तर कधी थक्क करणारे व्हिडीओ चर्चेत येतात. काही व्हिडीओ भावूक करणारे असतात. सध्या असाच हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

हेही वाचा : बापरे! घरच्यांना कळू नये म्हणून लपवली चक्क चप्पलमध्ये सिगारेट अन् आगपेटी, तरुणाचा जुगाड पाहून तुम्हीही डोकं धराल!

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका व्यक्तीच्या हातात पोळी आहे आणि ही पोळी नळाच्या पाण्याने भिजवून ती व्यक्ती खाताना दिसतेय.व्हिडीओ पाहून तुम्हाला अंदाज येईल की व्यक्तीला भूक लागली असावी आणि त्या व्यक्तीजवळ खायला कदाचित पोळीशिवाय काहीही नसावे. त्यामुळे ती व्यक्ती पोळी नळाच्या पाण्याने भिजवून खाताना दिसत आहे. व्हिडओ पाहून कोणालाही त्या व्यक्तीची दया येईल. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आणि मुले म्हणतात, तुम्ही आमच्यासाठी काय केले. आपल्या आईवडीलांना कधीही विसरू नये.” हा व्हिडीओ वडिलांना उद्देशून शेअर केला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वडिलांविषयी फारसे बोलले जात नाही पण त्यांच्या संघर्षाला कुठेही तोड नसते. ते कोणतीही अपेक्षा न करता आयुष्यभर मुलांसाठी संघर्ष करतात.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Viral Video: आता भिकारी झाले तुमच्यापेक्षा हूशार; सुट्टे पैसे नाही सांगताच काढली कार्ड स्वाइप मशीन

Nikky Mathur या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आजचा व्हिडीओ त्या लोकांसाठी जे वडिलांना म्हणतात, “आमच्या काय केले तुम्ही..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “वडिलांची जागा आकाशापेक्षा उंच आहे आणि आईची जागी ही पृथ्वीपेक्षा जड आहे” तर एका युजरने लिहिलेय, “वडिलांना खरंच सलाम. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतो आणि आपले दु:ख सुद्धा सांगत नाही.” अनेक युजर्स व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत.

सोशल मीडियावर वडिलांवर आधारीत अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापूर्वी सुद्धा वडिलांची महती सांगणारे अनेक व्हिडीओ चर्चेत आले आहेत.