Viral Video : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात स्वच्छतेला अधिक महत्त्व दिले जात आहे. स्वच्छ भारत अभियानाद्वारे देशात स्वच्छतेला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीसुद्धा काही लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि सार्वजानिक ठिकाणी कचरा करतात. तुम्ही आपल्या देशात रस्त्यावर अनेक तंबाखू गुटख्याची वापरलेली पाकिटे पडलेली पाहिली असेल पण कधी परदेशात रस्त्यावर तंबाखू गुटख्याची रिकामे पाकिटे पडलेली पाहिली आहे का? जर नाही, तर हा व्हिडीओ पाहाच. कारण या व्हिडीओमध्येया व्हिडीओमध्ये चक्क युकेच्या रस्त्यावर ‘चैनी खैनी’ सारखे पाकिटे पडलेली दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a man spotting several empty packets of including Chaini Khanis littered around in UK video goes viral)

युकेच्या रस्त्यावर पडली होती तंबाकू – गुटख्याचे पाकिटे

हा व्हिडीओ युकेमध्ये राहणाऱ्या अनराग चौधरी नावाच्या तरुणाने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हा तरुण सांगतो, “भावा मी आज युकेमध्ये फिरत होतो. कोण म्हणते युकेमध्ये काही मिळत नाही. तुम्ही पाहा. येथे तुम्हाला चैनी खैनी भेटेल. तुम्हाला येथे उडता पंछी मिळेन. (रस्त्यावर पडलेली पाकिटे उचलून दाखवतो.) कोण म्हणतो परदेशात अशा गोष्टी मिळत नाही. तुम्हाला परदेशात सर्वच मिळणार. तुम्ही एकदा या.”

विशेष म्हणजे युकेमध्ये कोणत्याही ठिकाणी कचरा टाकला किंवा अस्वच्छता केली तर Environmental Protection Act 1990 नुसार गुन्हा मानला जातो. दोषी असलेल्या व्यक्तीला दंड भरावा लागतो.

हेही वाचा : देवा अशी गरिबी नको रे कोणाला! खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा खांद्यावर जबाबदारीचं ओझं; Video पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

anurag_in_uk या त्याच्या अकाउंटवरून तरुणाने हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चैनी खैनी खाणाऱ्या मित्रांना टॅग करा.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भावा उचलले होते पाकिट तर डस्टबिनमध्ये टाकायचे.” तर एका युजरने लिहिलेय, “वेगळा देश पण मानसिकता सारखीच आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “भारतीयांची काळी बाजू”

हेही वाचा : “Arranged Marriage असं गाजवा की लोकांना Love Marriage वाटलं पाहिजे!”, हळद लागताच नवरा-नवरीने केला भन्नाट डान्स, Video Viral

सोशल मीडियावर परदेशात राहणारे अनेक भारतीय त्यांचे अनुभव शेअर करताना दिसतात. कधी ते परदेशातील सोयी सुविधा दाखवतात तर कधी परदेशात राहून सुद्धा आपली भारतीय संस्कृती, परंपरा जपताना दिसतात. अनेकदा भारतीय सण उत्सव परदेशात साजरे करताना दिसतात.

Story img Loader