Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. लोकं रिल्स किंवा व्हिडीओ बनवण्यासाठी वाट्टेल ते करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चालत्या गाडीतून नोटा उडवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. हा व्हिडीओ नोएडा येथील असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला रेंज रोव्हर कार दिसेल. या कारमध्ये तरुणांचा ग्रुप दिसत आहे. यातील एक तरुण हाताने भर रस्त्यावर पैसे उडवताना दिसत आहे. चालत्या कारमधून रस्त्यावर पैसे उडवत ही तरुण मंडळी श्रीमंतीचा दिखावा करताना दिसत आहे.स्कॉर्पिओ चालवणाऱ्या एका तरुणाने या घटनेचा व्हिडीओ कैद केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी संताप व्यक्त केला आणि काही लोकांनी या तरुणांवर कारवाई करण्याची सुद्धा मागणी केली होती.
Raajesh Khatri या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नोएडा येथे रस्त्यावर एका लक्झरी गाडीमध्ये सैर करणारा तरुण नोटा उडवताना दिसला. एका दुसऱ्या कारमधील व्यक्तीनी याचा व्हिडीओ बनवला असून सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ सेक्टर २० क्षेत्रातला आहे.” या कॅप्शनमध्ये युपी पोलिस, पोलिस आयुक्त आणि ट्रॅफिक पोलिसांना टॅग केले होते.
हेही वाचा : बापरे! खेळ जीवावर बेतला; गारुड्याला चावला साप, हातावर ब्लेडनी केले सपासप वार; पाहा VIDEO
पोलिसांनी केली कारवाई
या व्हायरल व्हिडीओवर युपी पोलिसांनी कमेंट करून नोएडा पोलिसांना या घटनेचा तपास करण्यास सांगितले होते. त्यावर उत्तर म्हणून नोएडा पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती सांगितली. त्यांनी लिहिलेय, “संबंधित वाहनाविरुद्ध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नियमानुसार त्यांच्याकडून २१ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.” पुढे त्यांनी हेल्पलाईन नंबर सुद्धा शेअर केला आहे. पोलिसांच्या या वेगवान कारवाईचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.