Guinness World Records: गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (GWR)मध्ये आतापर्यंत जगभरातील अनेक रेकॉर्ड ब्रेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. भारतातील अनेक व्यक्तींच्या नावाचादेखील या यादीत समावेश झाला आहे, ज्यात जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेपासून ते अनेक तास नृत्य करणाऱ्या महिलेपर्यंत अनेकांचा समावेश आहे. दरम्यान, आता हैदराबाद येथील एका व्यक्तीने काही सेकंदात इंग्रजी वर्णमाला टाइप करण्याचा विक्रम केलेला आहे. हा व्हिडीओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (GWR)ने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (GWR)मध्ये आपल्या नावाचा समावेश करणाऱ्या व्यक्तीचे नाव एस. के. अश्रफ असून तो या व्हिडीओच्या सुरुवातीला एका डेस्कटॉपसमोर बसलेला दिसत आहे. त्याच्या शेजारी असलेल्या व्यक्तीने टायमर सुरू केल्यानंतर एस. के. अश्रफ केवळ २.८८ सेकंदामध्ये इंग्रजी वर्णमालेतील अक्षरं उलट्या बाजूने टाइप करतो.

हेही वाचा : थरारक! कारच्या मागील चाकात अडकला भलामोठा अजगर; VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

पाहा व्हिडीओ :

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (GWR)ने पोस्ट केलेल्या या व्हिडीओखाली कॅप्शनमध्ये, “केवळ २.८८ सेकंदात जलद गतीने उलट्या बाजूने इंग्रजी वर्णमालेतील अक्षरं एस. के. अश्रफने टाइप केली”, असं लिहिलंय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून या व्हिडीओला आत्तापर्यंत ९.९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओला जवळपास ३४,००० लाईक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक जण एस. के. अश्रफचे कौतुक करताना दिसत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “हा खूप अविश्वसनीय विक्रम आहे”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “खूप दिवसांनंतर एक चांगला विश्वविक्रम पाहिला”. तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “भारतीयांसाठी ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याआधीदेखील हैदराबादमधील खुर्शीद हुसेन नावाच्या एका व्यक्तीने नाकाने सर्वात जलद टायपिंग करण्याचा विक्रम केला होता. यात त्याने ४७ सेकंदात नाकाने १०३ अक्षरे टाइप केली होती.