उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून हल्ली कडक उन्हाची झळ सर्वांनाच बसू लागली आहे. आपण माणसे उन्हापासून वाचण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर करू शकतो, परंतु मुक्या जनावरांचे मात्र अशावेळी हाल होतात. मात्र सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला संबंधित व्यक्तींचे कौतुक केल्याशिवाय राहवणार नाही. या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की महाराष्ट्र पोलीस कर्मचारी एका तहानलेल्या माकडाला पाणी पाजत आहेत.

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील माळशेज घाटावर तैनात असलेले वाहतूक पोलीस जवळपासच्या जंगलातून रस्त्यावर येणाऱ्या प्राण्यांना देण्यासाठी पाण्याच्या अनेक बाटल्या घेऊन जातात. या व्हिडीओमधील पोलीस कर्मचारी एका तहानलेल्या माकडाला बाटलीतून पाणी पाजताना दिसले. माकडही आपल्या हाताने बाटली पकडून पाणी पित होते. StreetDogsofBombay नावाच्या इन्स्टाग्राम पेजने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘शेवटपर्यंत पहा – निष्पाप प्राण्याबद्दलच्या दयाळूपणा आणि करुणेसाठी महाराष्ट्र पोलिसांना सलाम.’

गरमीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने केला हटके जुगाड; Viral Video पाहून पोट धरून हसाल

उन्हाळा वाढत आहे आणि लहान प्राणी पाणी शोधत आहेत, म्हणून कृपया आपल्या घराबाहेर पाण्याचे भांडे ठेवा आणि उष्णतेपासून त्यांचे संरक्षण करा. याशिवाय आपण अनेकदा, भटके प्राणी दुकान/हॉटेलजवळ तासंतास आपल्याला कोणीतरी खायला देईल या आशेने उभे असलेले पाहतो. परंतु त्यांना माहीत नसतं की खाण्यासाठी पैसे लागतात. अशावेळी आपण या कुत्र्यांना खाऊ घालावं. काही लोक पाळीव आणि भटक्या कुत्र्यांमध्ये भेदभाव करतात. लोक भटक्या प्राण्यांना घाण समजतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आणि पोलिसांची दयाळूपणा आणि करुणा पाहून लोक प्रभावित झाले. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, ‘हा व्हिडीओ हृदयाला स्पर्श करणारा आहे.’ त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, ‘ज्याने प्राण्याला मदत केली त्या व्यक्तीला देव आशीर्वाद देतो.’ इतर अनेक युजर्सनीही या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.