Viral Video : गणेशोत्सवादरम्यान सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. तसेच आज पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जनसुद्धा करण्यात येईल. यादरम्यान अनेक ठिकाणी संरक्षणासाठी पोलिस दलातील अधिकारी ठिकठिकाणी उभे असतात आणि नागरिकांचे रक्षण करत असतात. आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पहायला मिळालं आहे. एक पोलिस अधिकारी चिमुकल्यांना गणपती बाप्पाचे दर्शन घेता यावे यासाठी त्यांना उचलून घेऊन त्यांचा मार्ग सोपा करताना दिसून आले.

लालबागचा राजा हा गणपती लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. लालबागच्या राजाच्या एका झलकसाठी अनेकजण भक्तिभावाने तासनतास रांगेत उभे राहतात आणि दर्शन घेतात. लहान मुलांपासून ते अगदी आजी-आजोबांपर्यंत सगळेच बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लालबागला येतात. तर आज व्हायरल व्हिडीओसुद्धा लालबागच्या गणपती बाप्पाचा आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक, मंडळाचे सदस्य, सुरक्षेसाठी पोलिस आदी अनेक मंडळी मंडपात उपस्थित आहेत. अशातच लहान मुलांना गणपती बाप्पाचे दर्शन घेता यावे यासाठी एक पोलिस अधिकारी लहान मुलांना उचलून घेऊन त्यांना गणपती बाप्पाची भव्य मूर्ती दाखवताना दिसून येत आहे. कशाप्रकारे पोलिस अधिकारी लहान मुलांना बाप्पाचे दर्शन करून देत आहेत, एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाचं…

हेही वाचा… ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाण्याची कोकणामध्ये भजनातही क्रेझ; बुवांच्या भजनाचा Video व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

बाप्पाच्या दर्शनासाठी चिमुकल्यांचा मार्ग केला सोपा :

प्रत्येक सणांदरम्यान खाकी वर्दी घालून पोलिस अधिकारी नेहमीच नागरिकांचे रक्षण करतात. स्वतःची सुखं-दुःख बाजूला ठेवून नेहमी आपल्या सगळ्यांच्या आनंदात सहभागी होतात आणि चोवीस तास न डगमगता नागरिकांची सेवा करण्यासाठी तयार असतात. गणेशोत्सवादरम्यान अनेकदा रांगेमध्ये गर्दी वाढते आणि चेंगराचेंगरीसुद्धा होते. अशावेळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देता पोलिसांना या गोष्टी सांभाळाव्या लागतात. तर आजच्या व्हिडीओतसुद्धा असंच काहीसं पहायला मिळालं. गर्दीत चिमुकल्यांना अगदी व्यवस्थित दर्शन घेता यावे, यासाठी लहान मुलांना उचलून घेऊन त्यांना लालबागच्या राजाची खास झलक दाखवण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिस अधिकारी मनोज राजपूत यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर @psimanojrajput या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे आणि “गर्दीत देव, वर्दीत देव” असे खास कॅप्शन दिले आहे. व्हिडीओ पाहून, माणूस उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतो गर्दीतला’अशी एका युजरने खास कमेंट केली आहे. तसेच ‘एकच नंबर मनोज दादा’, “गर्दीत देव, वर्दीत देवदूत” अशा अनेक सुंदर कमेंट अनेकजण करताना दिसून आले आहेत.