मैत्री हे जगातील सर्वात सुंदर नातं आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक नाती असतात जन्मानंतर किंवा लग्नानंतर आपल्याबरोबर जोडली जातात पण मैत्री एकमेव असे नाते आहे जे आपण स्वत: निवडतो. तसे पाहायला गेले तर प्रत्येकाला अनेक मित्र-मैत्रिणी असतात पण खरे मित्र हे मोजकेच असतात. आपले खरे मित्र कोण आहेत हे आपल्याला अडचणीच्या वेळ जो साथ देतो तोच खरा मित्र मानला जातो. संकटामध्ये धावून येणारा मित्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात हे विसरू नका. खरी मैत्री काय असते समजून घ्यायचे असेल तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दोन शाळकरी मुलांचा हा व्हिडिओ नक्की बघा.

हीच खरी मैत्री

व्हायरल व्हि़डीओमध्ये एक व्यक्ती दोन शाळकरी मुलांबरोबर संवाद साधताना दिसत आहेत. दोघांपैकी एका मुलगा दिव्यांग असल्याने त्याला स्वत:चे दप्तर घेऊन नीट चालता येत नाही. त्यामुळे त्याचा मित्र रोज स्वत:चे आणि आपल्या दिव्यांग मित्राचे दप्तर घेऊन चालत शाळेत जातो. व्हिडोओमधील व्यक्ती त्यांना विचारतो त्यांना विचारतो तुमचा खास मित्र कोण आहे तेव्हा दोघेही एकमेकांचे नाव सांगत आपला खास मित्र असल्याचे सांगतात. तसेच त्यांचा आणखी एक खास मित्र तिथे उपस्थित नसतानाही त्याचे नाव घ्यायला ते दोघे विसरले नाहीत. पण व्हायरल व्हिडिओ पाहून दिसत आहे की, दिव्यांग मुलगा रस्त्यावर पुढे चालत आहे आणि त्याच्यामागे त्याचा मित्र दोघांच्या बॅग घेऊन जातान दिसत आहे. दोघांची मैत्री पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. व्हिडिओ पाहून प्रत्येकाला असा एकतरी मित्र असावा अशी भावना निर्माण होत आहे.

हेही वाचा – शिव-पार्वती विवाह सोहळा आता पुण्यात!, तुम्ही पाहिला का ‘हा’ जिवंत देखावा? Video होतोय Viral

चिमुकल्यांची मैत्री पाहून भावूक झाले नेटकरी

व्हायरल व्हिडिओ manya_devkate नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हिडीओच्य कॅप्शनमध्ये लिहिले की, मैत्री! शारदा विद्यालय, सहजपुर, ता. दौंड, पुणे ४१२२०२. व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरपूर प्रतिक्रिया केल्या आहेत.

हेही वाचा – ‘शापित पार्किंग क्षेत्र, विश्वास नसल्यास….!”, नो-पार्किंगमध्ये गाडी लावणाऱ्यांना पुणेकरांचा टोला; पुणेरी पाटी Viral

एकाने कमेटं करत लिहिले की, आपल्या गैरहजरसुद्धा आपली हजेरी लावणारा मित्र. नशीब आहे त्या निवृत्तीचं

दुसरा म्हणाला की, छान, त्याच्या आईबाबाने त्याला मदतीसाठी लहानपणापासून शिकवण दिली. छान रे बाळा”

तिसरा म्हणाला, “डोळ्यात पाणी आल रे भावा”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौथा म्हणाला की, बाळांनो, याला म्हणतात मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…खूप छान एकमेकांना साथ देत राहा.