video shows man peacefully sleeping under open umbrella : धावपळीच्या जीवनात स्वत:कडे लक्ष द्यायला आपल्यापैकी कोणाकडेच वेळ नाही आणि त्यामुळे कित्येकांची कधी कधी झोपही पूर्ण होत नाही. त्यामुळे ट्रेन, बसमधून ऑफिसला जाताना प्रवासादरम्यान आपण थोडा वेळ डोळे बंद करून विश्रांती घेतो. ट्रेन, बसमध्ये विश्रांती घेणं ठीक आहे. पण, तुम्ही कधी कोणाला रेल्वे ट्रॅकवर झोपल्याचं पाहिलं आहे का? नाही… मग आज सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कारण- एक व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर छत्रीच्या सावलीखाली शांतपणे झोपल्याचं दिसत आहे. नक्की काय घडलं आहे ते लेखातून सविस्तर जाणून घेऊ…

व्हायरल व्हिडीओ (Video) उत्तर प्रदेशचा आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील रेल्वे ट्रॅकवर एक वृद्ध व्यक्ती छत्रीच्या सावलीखाली शांतपणे झोपलेली दिसत आहे. तितक्यात समोरून ट्रेन येते. रुळांवर एका व्यक्तीला छत्रीच्या सावलीखाली शांतपणे झोपलेलं पाहून लोको पायलटनं ट्रेन थांबवली आणि त्या व्यक्तीची झोप उडवण्यासाठी तो हॉर्न वाजवताना दिसला. हॉर्नचा आवाज ऐकून, इतर प्रवाशांच्या मदतीनं त्या व्यक्तीला ट्रॅकवरून उठवलं जाते आणि मग लोको पायलट ट्रेन पुढे घेऊन जातो. तुम्हीसुद्धा बघा हा व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…Krishna Janmashtami 2024: चॉकलेटच्या बॉक्सपासून बनवा श्री कृष्णाचा पाळणा; VIDEO तून पाहा सोप्पी सजावट

व्हिडीओ नक्की बघा…

व्यक्ती झोपली थेट रेल्वे रुळांवर :

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिलं असेल की, एक व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर छत्री घेऊन निवांत झोपलेली दिसत आहे. नंतर त्या ट्रॅकवर रेल्वे येते आणि लोको पायलट हॉर्न वाजवण्यास सुरुवात करतो. हॉर्नचा आवाज ऐकून व्यक्ती उठते आणि निघून जाते. या व्हिडीओच्या शेअरकर्त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, “यूपीच्या प्रयागराजमध्ये एक व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर छत्री घेऊन झोपली होती. ते पाहून लोको पायलटने ट्रेन थांबवली आणि मग त्याला उठवले, रुळांवरून बाजूला काढले. मग ट्रेन पुढे सरकली.” हा व्हिडीओ पाहून काही लोकांना चिंताही वाटली; तर काही लोक या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Video) @SachinGuptaUP या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. एक्स युजर सचिन गुप्ता यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओची सुरुवात सुरक्षित अंतरावर ट्रेन थांबली आहे आणि दुसरीकडे छत्रीखाली झोपलेली वृद्ध व्यक्ती दिसत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणत आहेत, “आपल्या जगात असे अनेक हुशार लोक आहेत.” दुसरा युजर म्हणतोय की, हे पूर्णपणे गोंधळात टाकणारे दृश्य आहे. तिसऱ्या युजरने कमेंट केली आहे की, त्याला झोपताना छत्री का हवी होती आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.