तुम्हाला कधी आपल्या आसपास होत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा कंटाळा येतो का? तुमचे कॉलेज, नोकरी, तुमचे मित्र-मैत्रिणी, तुमचे कुटूंब, नातेवाईक आणि समाजापासून दूर जाऊन काही काळ शांतपणे एकांतात घालवावे असे तुम्हाला वाटते का? सोशल मिडिया, मोबाईल, इंटरनेट सर्वकाही सोडून एकांतामध्ये तुम्ही राहू शकता का?

तुम्ही म्हणाल, एकांतामध्ये राहणे वगैरे ठिक आहे पण आजच्या काळात मोबाईल- इंटरनेटशिवाय कसे राहणार? आपल्या आसपास एकही मनुष्य नसेल तर आपण एकटे राहू शकत नाही. तुम्हाला असे वाटणे अगदी सहाजिक आहे पण तुम्हाला माहितीये का एका महिलेने हे सगळे शक्य करुन दाखवले आहे.

होय! तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण एका महिलेने जगापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्ण देखील केला आहे, तेही १-२ दिवसांसाठी नव्हे तर तब्बल ५०० दिवसांसाठी ही महिला एका सामसुम गुहेमध्ये राहत होती. नुकतेच २३० फुट खोल गुहेतून या महिलेला बाहेर काढण्यात आले आहे. इतक्या दिवसांनी हि महिला जेव्हा गुहेतून बाहेर आली तेव्हा सर्व काही बदलले होते. तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

रायटर्सने दिलेल्या माहितीनुसार,५० वर्षीय स्पॅनिश गिर्यारोहक बीट्रिझ फ्लॅमिनी (Beatriz Flamini) २३० फूट खोल गुहेत राहून ५०० दिवसांचे आव्हान पूर्ण केले आहे. जेव्हा ती ४८ वर्षांची होती तेव्हा एका संशोधनाकरिता तिने गुहेत राहण्याचा निर्णय घेतला. ती २० नोव्हेंबर २०२१ पासून १४ एप्रिल २०२३ पर्यंत ग्रॅनडा येथील २३० फूट खोल गुहेध्ये राहत होती. साधारण दीड वर्षानंतर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तिला गुहेतून बाहेर काढताना दिसत आहे.

हेही वाचा : फळविक्रेत्या महिलेची कामगिरी पाहून आनंद महिंद्रा झाले फॅन; ‘या’ एका कृतीला पाहून म्हणाले, ‘यांचा पत्ता सांगा’

२३० फूट खोल गुहेत बीट्रिझने कसे घालवले ५०० दिवस

बीट्रिझने २३० फूट खोल गुहेत एकटीने ५०० दिवस घालवले आहेत. या काळामध्ये आपले दोन वाढदिवस तिने गुहेतच साजरे केले. मात्र, मदतीसाठी एक टीम बाहेरून त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. गुफाच्या आता बीट्रीज जास्त वेळ व्यायाम करण्यात घालवत असे. त्याशिवाय ती चित्र काढत असे, शिलाई काम करत असे आणि पुस्तक वाचत असे. या ५०० दिवसांमध्ये तिने साधारण १००० लीटर पाणी प्यायले पण ती अंघोळ करू शकली नाही.

फ्लॅमिनीचा तिच्या सपोर्ट टीमशिवाय कोणाशीही संपर्क नव्हता, ज्यांनी तिला ताजे अन्न आणि कपडे पाठवले आणि “प्रत्येक पाच शौचानंतर” तिचा कचरा काढून टाकला. फ्लेमिनीसह संवाद न साधण्याचा हा नियम पाळताना जागतिक घटना आणि वैयक्तिक शोकांतिकेपर्यंत तिला काहीही सांगितले नाही. त्यामुळे तिला युक्रेनवरील रशियन आक्रमण किंवा कौटुंबिक मृत्यूबद्दल कोणतीही कल्पना नव्हती.

दीड वर्षानंतर गुहेतून बाहेर आल्यावर बदलले जग

जेव्हा बीट्रिझने गुहेमध्ये राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय हयात होत्या. रशिया-युक्रेन युद्धही सुरू झाले नव्हते. कोरोनाने जगावर कहर केला होता. अशा स्थितीत गुहेतून बाहेर आल्यानंतर बीट्रिझला जग बदलल्यासारखे वाटत आहे. बाहेर येताना बीट्रिझ म्हणाली, ”गुहेत राहून मी भावनांवर नियंत्रण ठेवले. घाबरली पण हिंमत्त सोडली नाही. मनातल्या मनात मी स्वत:सह खूप संवाद साधला.

हेही वाचा – फॅशन डिझायनरने नोकरी सोडून रस्त्यावर सुरु केला ‘हा’ भन्नाट व्यवसाय; होतेय प्रचंड गर्दी,

५०० दिवस गुहेमध्ये का राहिली बीट्रिझ

खरंतर, मानसशास्त्रज्ञ, संशोधक आणि गुहांवर संशोधन करणारे लोक एकत्र अभ्यास करत होते, ज्याचा उद्देश मानवी शरीर आणि मनाच्या क्षमता जाणून घेणे हा होता. निर्जन ठिकाणी (गुहा, जंगल इ.) एकटे राहिल्याने माणसाच्या शरीरात आणि त्याच्या हावभावांमध्ये बदल होतात, हे अभ्यासातून आढळून आले. त्यासाठी बीट्रिझने गुहेत राहण्याचे मान्य केले. आता तिच्या संपूर्ण शरीराची तपासणी करून निष्कर्ष काढण्यात येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा प्रयोग, दीर्घकाळ नैसर्गिक प्रकाश नसलेल्या गुहेत राहणाऱ्या फ्लॅमिनीचा मेंदू परिस्थितीसह कसा जुळवून घेतो याचा अभ्यास करण्याची मुख्य संधी संशोधकांना प्रदान करतो. असे दिसून आले की, तिने या परीक्षेचा चांगलाच सामना केला.