रेल्वेच्या प्रवासादरम्यान आपण काही ना काही खायला नक्कीच घेतो. पण प्रत्येकवेळीच हे पदार्थ चांगले असतीलच असे नाही. आयआरसीटीसीकडून देण्यात येणारे पदार्थ चांगले नसतात अशा अनेक तक्रारी प्रवाशांकडून करण्यात आल्या आहेत. नुकतीच अशी एक घटना समोर आली आहे. मुंबईहून लखनऊपर्यंत ट्रेनने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने एका समोशाचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने काय म्हटलंय पाहुयात.

अजी कुमार या ट्विटर युजरने आपल्या अकाउंटवर एका समोशाचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये अजीने त्याच्याबरोबर घडलेला प्रकार स्पष्ट केला आहे. अजीच्या पोस्टनुसार, मुंबई ते लखनऊ प्रवासादरम्यान त्याने आयआरसीटीसी पॅन्ट्रीमधून एक सामोसा विकत घेतला होता. मात्र यावेळी त्याच्याबरोबर एक विचित्र गोष्ट घडली. या समोशामध्ये त्याला एक पिवळा कागद सापडला. आपण अजीने शेअर केलेल्या फोटोमध्ये हा कागद पाहू शकतो.

Viral Video : गच्च भरलेल्या बसमध्ये अतिशय शांतपणे झोपला होता कुत्रा; मग प्रवाशांनी जे केलं ते पाहून तुम्हालाही वाटेल कौतुक

अजीने दिलेल्या माहितीनुसार तो ९ ऑक्टोबरला २०२९१ या ट्रेनमधून मुंबई ते लखनऊ असा प्रवास करत होता. यावेळी त्याने आयआरसीटीसी पॅन्ट्रीमधून एक सामोसा विकत घेतला. समोसा खात असताना त्यांना समोशामध्ये पिवळा कागद आढळला. यानंतर अजीने आयआरसीटीसीला टॅग करत ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे. यावर आता आयआरसीटीसीने स्पष्टीकरण दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयआरसीटीसीने अजीच्या ट्वीटची दखल घेत दिलगिरी व्यक्त केली आहे. आयआरसीटीसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर अजीचे ट्वीट रिट्विट करताना लिहिले – कृपया तुमचा पीएनआर आणि मोबाईल नंबर शेअर करा. दरम्यान अजीच्या ट्वीटवर अनेक वापरकर्त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.