Pune Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील असे शहर आहे येथे शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी दूर वरून तरुण मुले येतात. या शहराची संस्कृती, येथील ऐतिहासिक वास्तू आणि प्राचीन मंदिरे या शहराची ओळख आहे. तुम्ही पुणेरी पाट्या विषयी सुद्धा ओळखले असेल पण हल्ली पुण्यात एक नवीन ट्रेंड आला आहे. पुण्यात अनेक तरुण मंडळी हातात पाट्या घेऊन आणि त्या पाट्यावर भन्नाट मेसेज लिहून रस्त्यावर उभी असतात. या पाट्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.

असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण हातात पाटी घेऊन रस्त्यावर उभा आहे आणि हा तरुण लातूरचा आहे आणि पुण्यात नोकरी नाही तर मुलगी शोधतोय. तुम्हाला वाटेल हे काय प्रकरण आहे? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल.

या व्हायरल व्हिडिओमध्ये हा तरुण चक्क बायोडाटाची पाटी हातात घेऊन पुण्याच्या रस्त्यावर फिरताना दिसतोय. या तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : दिवाळी घेऊन येणार सुखाचे दिवस; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिन्यात मिळणार भरपूर पैसा, प्रेम अन् मानसन्मान

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल जो हातात पाटी घेऊन पुण्याच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्याने त्या पाटीवर काय लिहिलेय, तर या तरुणाने या पाटीवर चक्क त्याच्या लग्नाचा बायोडाटा लिहिलाय.
या पाटीवर तुम्हाला य तरुणाची संपूर्ण माहिती लिहिलेली दिसेल पाठीवर लिहिलेय,

“लग्नाचा बायोडाटा
मुलाची माहिती
नाव – वैभव पाटील
गाव – लातूर<br>शिक्षण – १२वी पास
शेती – आहे पण काम करणारी पाहिजे
नोकरी – रिल्स स्टार”
त्या पाटीवर खाली लिहिलेय,”अपेक्षा – पूर्वी कसली पण असू दे फक्त जिवंत पाहिजे.”
या फोटोवर या तरुणाने स्वतःचा फोटो सुद्धा लावला.

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल रस्त्यावरून येणारे जाणारे या तरुणाकडे बघताना दिसत आहे. काही लोक ही पाटी वाचताना दिसत आहे तर काही लोक या तरुणाचा व्हिडिओ सुद्धा बनवताना दिसत आहे.

हेही वाचा : Rangoli Designs : दिवाळीत रांगोळी काढण्यापूर्वी हे Video एकदा पाहाच; एकापेक्षा एक सुंदर रांगोळी डिझाइन्स!

पाहा व्हायरल व्हिडीओ

vabsnation_29 या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लग्नाचा बायोडाटा”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बाहेरची लोक पुण्यात येतात जॉब साठी आणि तुला… पुण्यातली मुलगी लातूरला जाणार नाही तुला पुण्यात स्थायिक व्हावं लागेल. पुणे ते पुणे” तर एका युजरने लिहिलेय,” नादच केला भावाने” आणखी एका युजरने लिहिलेय, “रील्स स्टार नोकरी म्हणजे सात जन्म सिंगल राहणार आता तू.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.