जुगाड करुन आपल्या गरजा पूर्ण करण आपल्यासाठी सामान्य गोष्ट आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण काही ना काही जुगाड करत असतो. सोशल मीडियावर असे कित्येक जुगाड व्हायरल होत असतात. सध्या असाच एक जुगाड व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तरुणाने दुचाकी चालवताना होणाऱ्या कंबरदुखीसाठी हटके जुगाड शोधला आहे. हा जुगाड कंबरदूखी तर दूर करेलच पण प्रवास आरामदायी करू शकतो. लोकांना हा जुगाड प्रचंड आवडला आहे. चला तर मग जाणून घेऊ या… काय आहे हा जुगाड?

इंस्टाग्रामवर zikiguy नावाच्या अकांउटवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये एक तरुणाला दुचाकी चालवताना खूप त्रास होत होता. बराच वेळ गाडी चालवून कंबर दुखत होती म्हणून त्याने दुचाकीला चक्क बॅकरेस्ट तयार केले आहे जेणेकरून आरामात टेकता येईल. जसे कारच्या सीटला पाठ ठेकवण्यासाठी बॅकरेस्ट असते तसेच त्याने दुचाकीलाही बॅकरेस्ट बसवून घेतले आहेत. तरुणाने संपूर्ण सीट नव्याने डिझाइन केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हेही वाचा – निस्वार्थ प्रेम! तरुणीला सासरी जाताना पाहून निरागस पाळीव कुत्र्याने पकडला तिचा पदर, पाहा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ

दुचाकी चालवणाऱ्याला आणि दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तीला, दोघांनाही आरामात प्रवास करता येईल.तरुणाने बॅटरीवर चालणारा ब्लुटुथ स्पिकरदेखील बसवला आहे ज्यामुळे दुचाकी चालवताना गाणी ऐकता येईल.

हेही वाचा – शास्त्रीय विरुद्ध पाश्चिमात्य; दोन तरुणींमध्ये रंगली डान्सची जुगलबंदी! पाहा व्हायरल व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकांना हा जुगाड फार आवडला आहे. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंटमध्ये लिहिले की, “हे भारी आहे, मला प्रश्न पडतो की आतापर्यंत हे कोणी का केल नाही?” दुसरा म्हणाला, भाऊ, मला ही स्कुटर भाड्याने मिळेल का?