Emotional Viral Video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हसवणारे असतात काही रडवणारे असतात तर काही व्हिडीओ हे विचार करायला भाग पाडतात. सोशल मीडियावर सध्या एक भावनिक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श करतोय. आज आपण प्रत्येक जण एक कधीही न संपणाऱ्या शर्यतीचा भाग बनलो आहोत. कुणी स्वत:साठी कुणी कुटुंबासाठी सतत धावत आहे. या शर्यतीत त्याला कशाचंही भान राहत नाही. असाच एक व्यक्ती तब्बल ७२ तासांच्या सततच्या ड्युटीनंतर घरी परततो. पण तो दारात प्रवेश करताच त्याच्या पत्तीनं असं काही केलं की पाहून तुम्हालाही दुख: होईल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रेल्वेमध्ये लोको पायलट म्हणून काम करणारा नवरा थकून घरी येतो आणि दार उघडतो, तेव्हा त्याची पत्नी त्याला रागाने शिव्या देऊ लागते.ती म्हणते, “तुम्ही ७२ तास रेल्वेला आणि १६ तास घराला देता. घरातील सर्व कामे मीच करायला हवीत का.यावरही तो व्यक्ती गप्प राहतो आणि थकलेल्या भावनेने ऐकत राहतो. त्याची शांतता आणि त्याच्या डोळ्यातील थकवा व्हिडिओमधील वापरकर्त्यांना भावला.”कधीकधी माणूस सर्वांसाठी लढतो, पण स्वतःसाठी लढत नाही” अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. एकानं म्हंटलंय, “कल्पना करा त्याच्या मात काय चालले आहे… त्याच्याकडे बोलण्यासाठी खूप काही आहे, पण त्याने अनावश्यक नाटक करण्याऐवजी थांबणे पसंत केले. एक खरा सज्जन. “पुरुषांचं दुख: कुणीच समजू शकत नाही” “अनेकांनी या व्हिडिओला आजच्या नातेसंबंधांच्या वास्तवाचे प्रतिबिंब म्हटले आहे, जिथे जबाबदाऱ्या आणि भावना अनेकदा एकमेकांशी संघर्ष करतात.
हा व्हिडिओ केवळ पतीचा थकवा दाखवत नाही तर तो सामाजिक दबाव देखील प्रतिबिंबित करतो ज्याखाली पुरुष अनेकदा त्यांच्या भावना लपवतात आणि फक्त जबाबदाऱ्यांचा भार सहन करतात.व्हिडिओ शेअर करताना, वापरकर्त्यांनी लिहिले – “ही फक्त एक क्लिप नाही तर प्रत्येक मेहनती व्यक्तीची वास्तविकता आहे.”