गुगल कंपनीत काम करण्याची इच्छा कोणाला नाही होणार? आता तिथे काम करणाऱ्याला लाखोंची नोकरी असते. एकदा का तिथे नोकरी मिळाली की गाडी, बंगला सगळंच सेट. तेव्हा अशी नोकरी कोण बरं सोडून देईल! पण एका भारतीय तरूणाने गुगलमधल्या आपल्या गडगंज पगाराला नाकारत स्वत:चा स्टार्ट अप बिझनेस सुरू केलाय. मुनफ कपाडियाने दोन वर्षांपूर्वी गुगलमधली नोकरी सोडली. आपल्या आईच्या मदतीने त्याने फूड स्टार्टअप बिझनेस सुरू केला. ‘बोहरी थाल’ ही आपली स्पेशल डिश त्याने लोकांपर्यंत पोहोचवली. मटन सामोसा, नरगीस कबाब, डब्बा गोश्त, कडी भात यासारख्या व्यंजनांनी परिपूर्ण असलेली मुनफची बोहरी थाल बघता बघता प्रसिद्ध झाली. भलेही गुगलची नोकरी गडगंज पगाराची होती, पण आपल्या आवडीचं काम करून जे सुख समाधान मिळत होतं ते त्याच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं.

Viral Video : प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांचा ‘गाढव’पणा आणि बघ्यांना धसका!

आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने आईची मदत घेतली म्हणूनच आपल्या फूड स्टार्ट अप बिझनेसला त्याने ‘मां के हाथ का खाना’ असं नाव दिलं. सुरुवातीला ई-मेल्स आणि मेसेजवरूनच तो ग्राहकांना आमंत्रण द्यायचा. पण हळूहळू त्याच्या हातच्या मटण सामोस्यांची चव अनेकांना आवडू लागली. लोकांची मागणी वाढू लागली तसा आपला व्यवसाय अधिक वाढवण्याकडे मुनफने भर द्यायला सुरूवात केली. लवकरच तो आपलं छोटंस हॉटेलही सुरू करणार असल्याची माहिती त्याने ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचा : ‘मंगळा’वर अडकलेल्या तरुणाला सुषमा स्वराज यांनी आणलं ‘जमिनी’वर