Ind Vs Nz : वानखेडे स्टेडियमवर एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना खेळला जातो आहे. सामन्यात स्टार खेळाडू विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे आणि आजच्या सामन्यात उत्तम फलंदाजी करत त्याचे ५०वे शतक पूर्ण केलं आहे. तर यादरम्यान सोशल मीडियावर विराट कोहलीचे कौतुक केले जात आहे. तर मुंबई पोलिसांनी सुद्धा खेळाडू विराट कोहलीचे अगदीच खास पद्धतीत कौतुक केले आहे आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे.
मुंबई पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केलं आहे. या पोस्टमध्ये टिम इंडियाचा खेळाडू विराट कोहली हातात बॅट घेऊन मैदानात उभा आहे ; असे दाखवण्यात आले आहे. तसेच विराट कोहलीच्या जर्सीचा नंबर १८ (18) आहे. तर मुंबई पोलिसांनी विराट कोहलीच्या जर्सीचा अठरा (१८) नंबरमधील (८) या अंकाला फिरवून दोन शून्यांमध्ये (००) त्याचे रूपांतर करून जर्सीवर शंभर (१००) नंबर एडिट केला आहे. मुंबई पोलिसांनी स्टार खेळाडू विराट कोहलीचे कोणत्या खास पद्धतीत कौतुक केलं आहे एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमधून बघा.
पोस्ट नक्की बघा :
जर्सीच्या नंबरचे केलं शंभरमध्ये रूपांतर :
क्रिकेट खेळातील सामन्यात आपला आवडत्या खेळाडूने उत्तम कामगिरी केली की, सर्व चाहते त्याचे फोटो स्टेट्स तसेच इस्टाग्राम स्टोरीला लावून त्यांचे कौतुक करताना दिसतात. तर आज मुंबई पोलिसांनी सुद्धा खास अंदाजात विराट कोहलीचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. विराट कोहली व्हिडीओत पाठमोरा उभा आहे त्याच्या जर्सीचा अठरा (१८) नंबर एडिट करून त्याचे रूपांतर शंभर (१००) मध्ये करण्यात आले आहे तसेच यादरम्यान सावलीत ५० व्या शतकाच्या विक्रमाचा आकडा मोठ्या अंकात दिसतो आहे.
टिम इंडियाचा खेळाडू विराट कोहलीने या सामन्यात ९ चौकार आणि २ षटकारसह ११७ धावा केल्या आणि त्याचे ५० वे शकत पूर्ण केलं आहे. हा व्हिडीओ मुंबई पोलीस यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) @MumbaiPolice या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांची ही पोस्ट पाहता विराट कोहलीचे चाहते यावर कमेंट करताना तर मुंबई पोलिसांनी खास एडिट केलेल्या या व्हिडीओची प्रशंसा करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.