सोशल मीडियावर अनेक AI निर्मित फोटो फिरत असतात. मात्र, सध्या अमूल कंपनीचा लोगो वापरून आणि त्यांच्या शैलीचे अनुकरण करून, एका खोट्या चीज उत्पादनाच्या पाकिटाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, या विनोदी चीज उत्पादनाच्या फोटोमुळे नेटकऱ्यांच्या मनात काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. हा फोटो व्हायरल होताच या प्रकरणावर ‘आनंद मिल्क युनियन लिमिटेड’ म्हणजेच ‘अमूल’ने ताबडतोब कारवाई करून खोट्या उत्पादनाचा फोटो सोशल मीडियावरून काढून टाकला होता.

अंकित सावंत या एक्स [ट्विटर] वापरकर्त्याच्या एका पोस्टमुळे या चीजच्या फोटोचा प्रकार चर्चेचा विषय ठरला होता. त्याने AI निर्मित खोट्या चीज उत्पादनाचा फोटो शेअर करून त्याला खाली, “शरम नावाचीसुद्धा चीज आहे…!” [Sharam naam ki bhi koi cheese hai…!] अशी कॅप्शन दिली होती. या फोटोमध्ये दिसणाऱ्या ‘शरम’ चीजवर अमूल असे लिहिले असून, त्यांच्या जाहिरात शैलीप्रमाणे संपूर्ण उत्पादनाचा फोटो तयार केला गेल्याचे दिसत होते. घरातील मोठे, लहानांना ओरडण्यासाठी ‘काही लाज शरम आहे की नाही?’ अशा पद्धतीचे वाक्य वापरत असतात, तीच कल्पना/शब्द वापरून हे ‘शरम’ नावाचे चीज, असे खोटे उत्पादन बनवण्यात आले आहे.

हेही वाचा : Viral Video : बिस्किटाच्या पाकिटांपासून बनवली भन्नाट पर्स! कचऱ्यातून कला म्हणजे काय, याचे उत्तम उदाहरण पाहा

परंतु, या पोस्टने मात्र सोशल मीडियावर एकाच गोंधळ निर्माण केला होता. काहींनी या पोस्टला साजेसे असे विनोददेखील [मीम्स] शेअर केले. एवढेच नव्हे, तर पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनीसुद्धा ‘अमूल’ने पोस्ट केलेल्या या प्रतिक्रियेला टॅग करून, ‘शरम नाम कि कोई चीज नहीं होती!’ अशी कॅप्शन लिहून शेअर केली आहे.

परंतु, या सर्व प्रकारावर अमूल या सुप्रसिद्ध कंपनीने अगदी त्वरित कारवाई केली असून, ग्राहकांच्या माहितीसाठी, “सोशल मीडियाच्या माध्यमांतून, व्हॉट्सॲपवरून एका खोट्या/ फेक चीज उत्पादनाचा फोटो फिरत आहे. परंतु, ते चीज उत्पादन अमूल कंपनीचे नाही याची आम्ही शाश्वती देतो.” असे एक्सच्या माध्यमातून ग्राहकांना स्पष्टीकरण दिल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्याने या AI निर्मित उत्पादनाची पोस्ट शेअर केली होती, त्याने या सर्व प्रकारांसंबंधी नंतर स्पष्टीकरण देत काही पोस्ट केल्या होत्या. त्यामध्ये त्याने, “मित्रांनो, हा एक AI निर्मित फोटो असून, तो केवळ गमतीच्या / मीमच्या दृष्टीने शेअर केला आहे. मला हे बनवायला केवळ एका मिनिटाचा अवधी जरी लागला असेल तरी AI चा वापर करून एखादी खोटी बातमी, अफवा पसरवणे किती सोपे आहे हे मला समजले आहे.” “परंतु तसे काही करण्याचा माझा हेतू नव्हता. माफ करा,” असे काहीसे त्यामध्ये लिहिण्यात आले होते.