लग्न हा आपल्या संस्कृतीमधील सर्वात मोठा सोहळा आहे जिथे नवरा-नवरी नवीन आयुष्य सुरू करतात. लग्न सोहळ्यातील उत्साह, मज्जा मस्ती दुसरीकडे कुठेच पहायला मिळत नाही. आज काल तर लग्नात नवरा -नवरीपासून त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सर्वजण खास डान्स सादर करतात.अनेकदा नवरा-नवरीच्या मित्र मैत्रिणी देखील उत्साहाने नाचताना दिसतात. सोशल मीडियावर लग्नातील डान्सचे कित्येक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कधी कोणी हळदीमध्ये बिनधास्तपणे नाचताना दिसते. कधी कोणी लग्नाच्या संगीतमध्ये अफलातून डान्स करून सर्वांचे मन जिंकतात. अशाच एका लग्न सोहळ्यापूर्वी बॅचरल पार्टी नवरदेवाच्या मित्रांचा अफलातून डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या तरुणांनी चक्क माधुरी दीक्षितच्या ‘धक धक करने लगा’ गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे तरुणांनी अतिशय मजेशीर अंदाजमध्ये डान्स केला आहे जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. हा डान्स इतका सुंदर आहे की अल्पकाळात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये पाहू शकता की तरुण धक धक गाण्याच्या तालावर अचूकपण थिरकत आहे. त्यांनी डान्स स्टेप अगदी सोप्या आहेत पण त्या पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येत आहे. व्हायरल व्हिडिओ amanavdc नावाच्या खात्यावर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे “दुल्हे के दोस्त” (नवरदेवाचे मित्र)
व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी त्यांचे कौतुक केले. एकाने कमेंट करत म्हटले की, “हा सिलसिला थांबवू नका(असेच नाचत राहा, इथेच थांबू नका)”
दुसर्याने लिहिले की, व्हिडिओ पाहताना माझ्या चेहऱ्यावर सतत हास्य होत.
दुसरा म्हणाला की, अगदी अचूकपणे स्टेप केल्या.
तिसरा म्हणाले की, काय बोलाव, एका पेक्षा एक भारी डान्स करत आहेत.
या नवरदेवांच्या मित्रांचा व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी उई अम्मा, तन डोले मेरा डोले, कुर्ची मदाथपेट्टी अशा गाण्यांवर मजेशीर डान्स केला होता जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.