Anant Ambani and Radhika Marchant Wedding: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अनंत त्याची बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंटबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. गेल्यावर्षीच दोघांचा साखरपुडा पार पडला. या साखपुड्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता लवकरच दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

दरम्यान मुकेश अंबानी यांचे गुजरातमधील मूळ गाव जामनगर येथे अनंत व राधिकाचे लग्नाअगोदरचे कार्यक्रम पार पडणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाची पत्रिका समोर आली होती. १ मार्च २०२४ ते ३ मार्च २०२४ असे जवळपास तीन दिवस हे कार्यक्रम चालणार आहेत. या कार्यक्रमात अनेक जगभरातील अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती सहभागी होणार आहेत. तसेच बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनाही या प्री वेडिंग कार्यक्रमाची पत्रिका देण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अंबानी कुटुंबाकडून जामनगरमध्ये जय्यद तयारीही करण्यात येत आहे.

अनंत व राधिकाच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर जामनगरमध्ये अंबानी कुटुंबाकडून १४ नवीन मंदिरांची निर्मिती करण्यात येत आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या सोशल मीडिया हँडलवर नुकतेच या मंदिराची झलक शेअर शेअर करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये नीता अंबानी मंदिर परिसरात फिरताना व कारागीर आणि स्थानिक लोकांशी बोलताना दिसत आहेत. ही मंदिरांची निर्मिती भारताच्या समृद्ध संस्कृती, वारसा आणि पौराणिक कथेच्या आधारावर करण्यात आली आहे.

हेही वाचा- कमाल! तरुणाने अवघ्या काही सेकंदात रेखाटली रणवीर सिंगची आयकॉनिक पात्रे; VIDEO पाहून अभिनेत्यानेही केलं कौतुक, म्हणाला

पाहुण्यांसाठी जेवणात असणार खास बेत

अनंत व राधिकाच्या अनंत व राधिकाच्या प्री वेडिंग कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांसाठी खास जेवण ठेवण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात पाहुण्यांना भारतातील निरनिराळ्या शहरांमधील जवळपास २५०० पदार्थ चाखायला मिळणार आहेत. यामध्ये एशियन, मेडिट्रोनियन, जॅपनीज, थाई, मैक्सिकन आणि पारसी पदार्थांचा समावेश आहे. यासाठी इंदौरवरून १३५ लोकांची टीम बोलवण्यात आली आहे. यामध्ये ६५ शेफ असणार आहे.