महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. त्यांचे ट्विट अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अलीकडेच, कांचीपुरम, तामिळनाडू येथील एका व्यक्तीने सोशल मीडियावर अविश्वसनीय स्केचद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्राही प्रभावित झाले आहेत.

तामिळनाडूतील कांचीपुरम येथे राहणारा गणेश हा कलाकार स्केच बनवण्यात माहिर आहे. आनंद महिंद्रा यांचे पोर्ट्रेट रेखाटणारा एक व्हिडीओ त्याने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तो ट्विस्ट तयार करताना दिसला. वास्तविक गणेशाने आनंद महिंद्रा यांच्या चित्राचे रेखाटन करण्यासाठी ७४१ प्राचीन तमिळ अक्षरे वापरली आहेत. जे पाहून कोणाचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे.

हायवेवरच्या फलकाला लटकून केली Exercise; Viral Video पाहून नेटकरी झाले हैराण

व्हिडीओमध्ये गणेश एका विशिष्ट फॉर्मेटमध्ये तमिळ अक्षरे लिहिताना दिसत आहे. जी शेवटी तो आनंद महिंद्राच्या स्केचमध्ये पूर्ण करतो. त्यामुळे आनंद महिंद्रा खूपच प्रभावित झाल्याचे दिसत आहे. आपल्या चाहत्यांपर्यंत गणेशची ही कला पोहचवण्यासाठी महिंद्रा यांनीही गणेशचे ट्विट रिट्विट केले आहे. आनंद महिंद्रा हे स्केच पाहून खूप प्रभावित झाले आहेत.

कहर! Swiggy वरुन Eggless केक केला ऑर्डर; पण केकवर लिहिलेला मेसेज पाहून ग्राहक झाला थक्क

विमानतळावरील कन्व्हेयर बेल्टवर पेपरमध्ये गुंडाळलेला मृतदेह?; Viral Video पाहून नेटकरी हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आनंद महिंद्रा यांनी सांगितले की, त्यांना हे स्केच त्यांच्या खोलीत बसवायचे आहे. त्यासाठी त्यांनी त्याची एक प्रतही मागितली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद महिंद्रा यांनी हे ट्विट तमिळ भाषेत केले आहे. त्यामुळे त्यांचे चाहते चांगलेच प्रभावित झाले आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओला २ लाख ७८ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. प्रत्येकजण कलाकाराच्या कौशल्याला दाद देत आहे.