एक वृद्ध जोडपे बिहारच्या समस्तीपूरच्या रस्त्यावर, आपल्या मुलाचा मृतदेह सरकारी रुग्णालयातून सोडवण्यासाठी पैसे मागत आहेत. रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने आपल्या मुलाचा मृतदेह देण्यासाठी ५०,००० रुपये मागितल्याचा आरोप या जोडप्याने केला आहे. दाम्पत्याकडे पैसे नसल्याने ते पैशांची भीक मागण्यासाठी शहरात फिरत आहेत. दरम्यान, या जोडप्याचा भीक मागतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मृताचे वडील महेश ठाकूर म्हणाले, “काही दिवसांपूर्वी माझा मुलगा बेपत्ता झाला होता. यानंतर, आमच्या मुलाचा मृतदेह समस्तीपूर येथील सदर हॉस्पिटलमध्ये असल्याचा फोन आला. आता, माझ्या मुलाचा मृतदेह सोडण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी आमच्याकडे ५० हजार रुपये मागत आहे. आम्ही गरीब आहोत, इतकी मोठी रक्कम आम्ही कशी भरणार?”

‘गाढवावरुन ऑफिसला यायची परवानगी द्या’; पाकिस्तानमधील कर्मचाऱ्याचं पत्र व्हायरल

रुग्णालयातील बहुतांश आरोग्य कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत असल्याने अनेकदा त्यांना पगार वेळेवर मिळत नाही. कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतल्याच्या अनेक घटना याआधीही घडल्या आहेत, असेही ते म्हणाले.

३५ रुपयांच्या परताव्यासाठी तब्बल ५ वर्षे भारतीय रेल्वेशी केली कायदेशीर लढाई; आता ३ लाख प्रवाशांना ‘असा’ होणार फायदा

दरम्यान, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (एडीएम) विनय कुमार राय यांनी सांगितले, ‘या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर असे आढळून आले की हे संपूर्ण प्रकरण चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आहे.’ जिल्हा प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत त्यांनी या वृत्तांचे खंडन केले. त्यांनी सांगितले की मृतदेह पोलिसांच्या ताब्यात असून ७२ तासांपूर्वी तो सोडायचा नाही, अशा सूचना आहेत. शवागारातील कर्मचाऱ्यांनी पालकांना सांगितले होते की, ५० हजार रुपये दिले तरी ते मृतदेह ताब्यात देऊ शकणार नाहीत. एडीएम म्हणाले की, हे विधान कुटुंबीयांना चुकीच्या पद्धतीने समजले आहे.

सप्तपदी दरम्यान वधूचा स्टेजवरच मृत्यू; यानंतर वराने तिच्या बहिणीशी बांधली लग्नगाठ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समस्तीपूर येथील सिव्हिल सर्जन, डॉ. एस. के. चौधरी यांनी बुधवारी सांगितले की, दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. “आम्ही या प्रकरणी नक्कीच कठोर कारवाई करू. दोषी आढळणाऱ्यांना सोडले जाणार नाही.” असे ते म्हणाले.