Indian Railway Interesting Toilet Story: जेव्हा आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात जातो तेव्हा अनेकदा आपण रेल्वेने प्रवास करतो. रेल्वे प्रवास अत्यंत स्वस्त आणि आरामदायी असतो. प्रवासादरम्यान आपल्याला रेल्वेमध्ये जेवणाची व्यवस्था असते, पाणी मिळत आणि आणखी अनेक सुविधा दिल्या जातात. इतकेच नव्हे तर रेल्वेमध्ये टॉयलेटची देखील सोय असते. तुम्ही म्हणाल यात नवीन काय आहे ? हे तर सर्वांना माहिती आहे पण, तुम्हाला हे माहित आहे का, रेल्वेमध्ये टॉयलेटची सुविधा केव्हापासून सुरु झाली होती आणि एका भारतीय व्यक्तीच्या पत्रामुळे रेल्वेमध्ये टॉयलेटची सुविधा सुरू करण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला त्या भारतीय व्यक्तीबद्दल सांगणार आहोत.

तर त्याचे झालं असे की, १९१९मध्ये ब्रिटिश रेल्वेला एक असे पत्र मिळाले ज्याने इंग्रजांना टॉयलेट बनवण्यास भाग पाडले. या भारतीय व्यक्तीचे नाव आहे ओखील चंद्र सेन. त्यांनी एका समस्येमुळे भारतीय रेल्वेला एक पत्र लिहिले जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ओखिल चंद्र सेनने यांनी ब्रिटीश रेल्वे प्रशासनाला लिहिलेल पत्र
आदरणीय सर,
मी रेल्वेने अहमदपुर स्टेशनपर्यंत प्रवास केला. माझ्या पोटात कळ आल्याने मला टॉयलेटमध्ये जावे लागले पण तेवढ्यात माझी गाडी चुकली. गार्डने माझी परत येण्याची वाट देखील पाहिली नाही. माझ्या एका हातात तांब्या होता आणि दुसऱ्या हातात धोतर.. मी धोतर पकडून पळत होतो आणि प्लॅटफॉर्मावर पडलो आणि माझे धोतर निसटले. तिथे सर्व माहिला-पुरुष उपस्थित होते त्यामुळे मला लज्जित व्हावे लागले आणि रेल्वे निघून गेली. त्यामुळे मला अहमदपूर स्टेशनवर थांबावे लागले. ही किती वाईट आणि दुखद गोष्ट आहे की, एक प्रवासी टॉयलेट करण्यासाठी गेला होता आणि ट्रेन गार्डने काही मिनिटांसाठी रेल्वे थांबवली देखील नाही. मी तुम्हाला विनंती करतो की, त्या गार्डला दंड ठोठवा अन्यथा मी हे सर्व वृत्तपत्रांमधून सर्वांना सांगेन.
तुमचा विश्वसनीय सेवक
ओखील चंद्र सेन

हेही वाचा – ऐकाव ते नवलचं! फक्त चार फुट जागेत उभारली तीन मजली इमारत; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही

हेही वाचा – कुत्रा नव्हे तर चक्क वाघाच्या गळ्यात साखळी बांधून फिरवतोय ‘हा’ चिमुकला! धक्कादायक व्हिडीओ पाहून भटकले नेटकरी..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पत्राने इंग्रजांना या समस्येवर विचार करण्यास भाग पाडले आणि तातडीने रेल्वेमध्ये टॉयलेट बसवण्यात आले. ओखिल चंद्र सेन यांच्यामुळे आज भारतीय रेल्वेमध्ये टॉयलेटची सुविधा निर्माण झाली आणि आज आपण सर्वजण आरामात रेल्वेने प्रवास करू शकतो.