Anand Mahindra Tweet: भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात १० गडी राखून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. या सामन्यानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच आता प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा आणि शशी थरूर यांनी टीम इंडियाच्या पराभवावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे या पराभवानंतर आनंद महिंद्रा यांनाही आपला राग लपवता आला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पराभवाचे दुःख नाही, पण पराभवाच्या पद्धतीचे …

भारताच्या पराभवानंतर आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे की, पराभवामुळे दुःख नाही, पराभवाच्या पद्धतीने होते. खेळाचा बदलणारा वेग क्रूर असू शकतो. आपण याकडे उगवण्याची आणखी एक संधी म्हणून पाहू. आनंद महिंद्रा सुरुवातीपासूनच टीम इंडियाला प्रोत्साहन देत आहे. मात्र उपांत्य फेरीतील या पराभवाने त्याचे मन दुखावले आहे.

( हे ही वाचा: Video: परदेशी सुनेची शेतात कांदे पेरण्याची पद्धत एकदा बघाच, यावर सासूने दिलेली प्रतिक्रिया होतेय तुफान Viral)

शशी थरूर यांचे ट्वीटही चर्चेत..

त्याचवेळी शशी थरूर यांनीही असेच काहीसे ट्वीट केले आहे. त्याने लिहिले की मला पराभवाचा काहीच फरक पडत नाही. विजय-पराजय हा खेळाचा भाग आहे. पण माझा आक्षेप आहे की भारताने स्पिरिट दाखवला नाही आणि तो खेळात दिसत नव्हता. शशी थरूर यांचे हे ट्वीट सोशल मीडियावरही चर्चेचा विषय आहे. यावर युजर्स आपल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

( हे ही वाचा: Video: लग्नात बेभान नाचत होती ‘ही’ महिला; उड्या मारत असा डान्स केला की पाहुणेही झाले फिदा)

इंग्लडकडून भारताचा लाजिरवाणा पराभव

टी-२० वर्ल्ड कप २०२२ मधील भारतीय संघाचा प्रवास संपुष्टात आला आहे. अॅडलेडमध्ये गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाला १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. भारताने इंग्लंडला विजयासाठी १६९ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी सहज गाठले. आता अंतिम सामन्यात इंग्लंडचा संघ पाकिस्तानशी भिडणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra reaction on team india defeat in t20 world cup semifinal vs england gps
First published on: 11-11-2022 at 10:57 IST